मुसलमान महिलेला धर्मांध घरमालकाकडून घर सोडण्याचा आदेश

धर्मांधांना सर्वधर्मसमभाव चालत नाही का ? कि ‘सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनीच घ्यायचा’, असे त्यांना वाटते ? याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, महिला आयोग गप्प का ? ‘जय श्रीराम’ न म्हटल्यावरून धर्मांधांना होणार्‍या कथित मारहाणीच्या बातम्या रंगवणारी प्रसारमाध्यमे अशा बातम्यांविषयी मात्र सोयीस्कर मौन बाळगतात !

ऋचा भारती यांना जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची अट न्यायालयाकडून मागे

‘फेसबूक’वर इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह संदेश ‘शेअर’ केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे.

उत्तरप्रदेश सरकार सर्व मदरशांची माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवणार

काही दिवसांपूर्वी राज्यातील बिजनौर येथील मदरशामधून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्यावर राज्य सरकारने प्रत्येक मदरशाची माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ उत्तरप्रदेशच नव्हे, तर देशातील सर्व संशयास्पद मदरशांची माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे !

मायावती यांच्या भावाची ४०० कोटी रुपयांची भूमी जप्त

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांचा भाऊ आणि पक्षाचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांची ४०० कोटी रुपये मूल्याची ७ एकर भूमी आयकर विभागाने जप्त केली आहे. मायावती यांच्या भावाकडे इतक्या मूल्याची भूमी असेल, तर मायावती यांच्याकडे किती असेल ? असा प्रश्‍न जनतेच्या मनात येणारच !

३१ जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करा !

रामजन्मभूमी प्रकरणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या मध्यस्थ समितीने तिचा अहवाल १८ जुलै या दिवशी न्यायालयाला सादर केला. यावर न्यायालयाने ‘अंतिम अहवाल ३१ जुलैपर्यंत सादर करावा’, असा आदेश समितीला दिला.

२२ जुलैला ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण होणार !

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’ने) ‘चंद्रयान-२’ या यानाचे प्रक्षेपण २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कार्यक्रम आयोजित करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा !’ – जिहादी संघटना एस्.डी.पी.आय.चे हिरवे फुत्कार

१५ मिनिटांत ७५ कोटी हिंदूंना संपवण्याची धमकी देणार्‍या ओवैसींच्या चिथावणीखोर सभांविषयी अवाक्षरही न काढणारी धर्मांध एसडीपीआय संघटना हिंदूंच्या गुरुपौर्णिमा महोत्सवावर आक्षेप घेते ! त्यांना कधी काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांची कृती देशद्रोही वाटली आहे का ? त्याविरोधात त्यांनी कधी आवाज का उठवला नाही ?

संतांविषयी ऐकून होतो;परंतु संत निर्माण करणारी एखादी संस्था कधी पाहिली नव्हती ! – ह.भ.प.सुहासबुवा वझे

मी संतांविषय ऐकून होतो;परंतु संत निर्माण करणारी एखादी संस्था कधी पाहिली नव्हती. सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधक संतपदापर्यंत पोचत आहेत.संतपदी विराजमान झालेल्या साधकांची संख्या ऐकून चांगले वाटले.सनातन समाजासाठी पुष्कळ चांगले कार्य करत आहे.

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी विधानसभेत मांडला वर्ष २०१९-२० चा अर्थसंकल्प

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी सभागृहाच्या पटलावर मांडलेला;परंतु आरोग्याच्या कारणास्तव न वाचलेला वर्ष २०१९-२० वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी १८ जुलै या दिवशी सभागृहात वाचून दाखवला.

हे मृत्युंजय या नाटकाला गोव्यातील जनतेचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला !- सुनील वालावलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,मुंबई

८ जुलै १९१० या वर्षी फ्रान्स येथील मार्सेल बंदरात मौरया बोटीतून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्रात उडी मारली होती. ती त्रिखंडात गाजली आणि त्यामुळे ८ जुलै हा साहस दिवस म्हणून साजरा केला जातो.


Multi Language |Offline reading | PDF