रा.स्व. संघासह १९ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची माहिती गोळा करा ! – बिहारमधील पोलीस ठाण्यांना आदेश

बिहार पोलिसांच्या विशेष शाखेकडून सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून १९ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची माहिती गोळा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जनता दल (संयुक्त)च्या बिहारमध्ये धर्मांध संघटनांची माहिती गोळा करण्याचा आदेश बिहार पोलीस का देत नाहीत ?

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम

पाकमध्ये अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेविषयी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १७ जुलैला दिलेल्या निर्णयात कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर यापूर्वी देण्यात आलेली स्थागिती कायम ठेवली.

एका मासात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा आदेश,

न्यायालयाच्या अशा आदेशाचे पालन करतांना ‘प्रशासन नेहमीप्रमाणे केवळ हिंदूंचीच मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडते, तर अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांना हातही लावत नाही’, असा आजवरचा अनुभव आहे ! हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडणारे प्रशासन न्यायालयाचा आदेश असूनदेखील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना हातही लावत नाही !

युएईमधून प्रत्यार्पण झालेल्या १४ भारतीय जिहाद्यांचे देशात इस्लामिक स्टेटचे केंद्र उभारण्याचे प्रयत्न उघड

गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीने (‘युएई’ने) १४ भारतीय जिहाद्यांचे प्रत्यार्पण करत त्यांना भारताच्या कह्यात दिले होते. तत्पूर्वी युएईने त्यांना ६ मास कारागृहात ठेवले होते.

देशाच्या भूमीवरून सर्व घुसखोरांना बाहेर काढू ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

देशाच्या भूमीवर जितके अवैध प्रवासी, घुसखोर रहातात, त्यांची ओळख पटवली जाईल. यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे त्यांना देशाबाहेर काढले जाईल.

आतंकवादी हाफीज सईद याला पाकिस्तानात अटक

पाकने हाफीजला केलेली अटक ही धूळफेकच आहे, हे शेंबडे पोरही सांगेल ! पाकला खरोखर आतंकवाद्यांवर कारवाई करायची असती, तर हाफीजला केव्हाच अटक करून फासावर लटकवले असते !

विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित रहाण्यावर त्यागपत्रे दिलेल्या आमदारांनी स्वतःच निर्णय घ्यावा ! – सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी उद्या १८ जुलैला विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव मांडणार आहेत.

वर्ष २०१६ मधील प्रकरणातील कंत्राटदाराला वर्ष २०१९ मध्ये ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवणारे पोलीस प्रशासन अन्वेषण करून संबंधितांवर कारवाई का करत नाही ?

गोव्यात  झालेल्या ‘ब्रिक्स २०१६’ परिषदेत पहार्‍यावर असलेल्या पोलिसांना आरोग्यासाठी अपायकारक अन्न पुरवणार्‍या कंत्राटदाराला दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने एका महाविद्यालयातील पुस्तकातून कारगिल युद्धावरील धडा वगळला !

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारने महाविद्यालयातील अभ्यासक्रमातील पुस्तकातून कारगिल युद्धाचा धडा वगळला आहे. 

इंग्लंडच्या खेळाडूंनी ‘शॅम्पेन’ उडवल्यावर मुसलमान खेळाडू त्यांच्यापासून दूर गेले !

ब्रिटनमध्ये झालेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडने न्यूझीलंड संघाचा अंतिम सामान्यात पराजय करून विश्‍वचषक जिंकला. १४ जुलैला झालेल्या या सामन्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा केला.


Multi Language |Offline reading | PDF