महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या गुरुपरंपरेचे पूजन करून भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात व्यक्त केली कृतज्ञता !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य आध्यात्मिक संस्था यांच्या वतीने भारतात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !
गुरु माता गुरु पिता ॥ गुरु अमुची कुलदेवता ॥१॥
घोर पडता संकटे ॥ गुरु रक्षी मागे पुढे ॥२॥
काया, वाचा आणि मन ॥ गुरु चरणी अर्पण ॥३॥
एका जनार्दनी शरण ॥ गुरु एक जनार्दन ॥४॥

देवद येथील सनातन आश्रमातील श्री. शिवाजी वटकर १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

देवद येथील सनातन आश्रमात सेवा करणारे, तसेच तळमळ, चिकाटी, नम्रता इत्यादी दैवी गुणांद्वारे संतांचे मन जिंकणारे, तीव्र प्रारब्धावर मात करून व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे, राष्ट्र अन् धर्म यांच्या प्रेमापोटी अविरतपणे कार्यरत रहाणारे श्री. शिवाजी वटकर (वय ७२ वर्षे) हे सनातनच्या १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले.

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे ‘जय श्रीराम’ म्हणण्यास नकार देणार्‍या मदरशांतील मुलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न

‘जय श्रीराम’ म्हणण्यास नकार देणार्‍यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप करणे; मात्र पोलिसांच्या अन्वेषणात हा आरोप खोटा ठरणारी ही देशातील तिसरी घटना आहे ! यातून हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी धर्मांध कशा प्रकारे खोटा आरोप करत आहेत, हे लक्षात येते !

कुराणाच्या ५ प्रती १५ दिवसांत वाटण्याची अट, अन्यथा जामीन रहित होणार

‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू’, असे म्हणणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांना जामीन देतांना हिंदूंच्या धर्माविषयीची एखादी गोष्ट करण्याची अट का घालण्यात आली नाही?’, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित झाल्यास नवल ते काय ?

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे महिलेच्या मृत्यूनंतर धर्मांधांकडून रुग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना मारहाण

धर्मांधांना पाठीशी घालणारे पोलीस ! देशात अनेक ठिकाणी धर्मांधांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटना घडत असतांना याविषयी एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी किंवा राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत; मात्र कथित ‘जय श्रीराम’ न म्हटल्यावरून मारहाण झाल्याची आवई उठवणार्‍या धर्मांधांच्या बाजूने लगेच हे सर्वजण बोलू लागतात !

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेवर आज निर्णय

पाकमध्ये अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेविषयी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय उद्या, १७ जुलैला निकाल देणार आहे. हा निकाल भारताच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.

भटिंडा (पंजाब) येथे गोशाळेचे छप्पर कोसळल्याने १०० हून अधिक गायी दबल्याची शक्यता

१६ जुलै या दिवशी येथे असलेल्या एका गोशाळेचे छप्पर  कोसळल्याने त्याखाली १००हून अधिक गायी दबल्याचे सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री कवळेकर यांना नगरनियोजन, जेनिफर मोन्सेरात यांना महसूल, मायकल लोबो यांना ग्रामीण विकास, तर नेरी यांना जलस्रोत

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रीमंडळात नव्याने प्रवेश केलेल्या मंत्र्यांना खातेवाटप घोषित केले आहे, तसेच विद्यमान मंत्र्यांच्या काही खात्यांमध्येही पालट करण्यात आले आहेत. गोवा विधनासभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खातेवाटपाविषयीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गोवा विधानसभेत भाजपमधील २७ पैकी १८ आमदार काँग्रेसमधून आलेले

गोव्यात काँग्रेसमधील १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ४० सदस्यीय राज्य विधानसभेत भाजप आमदारांची संख्या २७ वर पोचली आहे. भाजपकडे आता दोन तृतियांश एवढे बहुमत झाले आहे. भाजपमधील सध्याचे १८ आमदार हे पूर्वीचे काँग्रेसमधील आमदार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF