गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक

गुरुकृपा सतत हवी : गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करीत रहाणे आवश्यक असते.

कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल (ध.) आघाडीच्या सर्व मंत्र्यांचे त्यागपत्र

कर्नाटकमध्ये गेल्या ३ दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय अस्थिरतेमध्येच आता सरकारमधील काँग्रेसच्या सर्व २१ आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष)च्या सर्व ११ मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे. आमदारांची त्यागपत्रे स्वीकारली गेल्यास कुमारस्वामी यांना बहुमतासाठी १०६ सदस्यांची आवश्यकता !

जमावाकडून होणार्‍या हत्यांच्या विरोधात सूरत (गुजरात) येथे धर्मांधांकडून विनाअनुमती मूकमोर्चा काढून हिंसाचार

अशा हिंसाचार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई का करण्यात येत नाही ? पोलीस नेहमीच हिंसक धर्मांधांसमोर शेपूट घालत असल्याने त्यांचा उद्दामपणा वाढला आहे ! जमावाकडून होणार्‍या हत्यांच्या विरोधात बोलणारे धर्मांधांच्या जमावाकडून झालेल्या या हिंसाचारावर का बोलत नाहीत ?

बलात्कारी तांत्रिक महंमद अली याला अटक

येथे महंमद अली या तांत्रिक बाबाला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

कोच्ची (केरळ) येथे वसतीगृहातील मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्रयाला अटक

‘प्रेम आणि शांती यांचे पुजारी’, अशी ओळख असणार्‍या पाद्रयांचे वासनांध रूप जाणा ! पाद्री आणि मुल्ला-मौलवी यांच्याकडून होणार्‍या लैंगिक शोषणांच्या घटनांविषयी पुरो(अधो)गामी कधीही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेचे विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण होणार

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेचे विशेष अन्वेषण पथकाद्वारे (एसआयटीद्वारे) सखोल अन्वेषण करण्याचा आदेश जलसंधारण विभागाकडून देण्यात आला आहे.

धोतर नेसलेल्या वृद्ध नागरिकाला शताब्दी रेल्वेत चढण्यापासून रेल्वे कर्मचार्‍याने रोखले

येथे रामअवध दास या ७२ वर्षीय वृद्ध नागरिकाला शताब्दी रेल्वेमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. त्यांनी धोतर नेसले होते आणि त्यांच्या हातात कपड्याची पिशवी अन् एक छत्री होती. या कारणाने त्यांना रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांनी रेल्वेच्या डब्यात चढण्यापासून रोखले.

अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटणखान्यात पाठवल्याच्या प्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलंदर शेख यांना १५ वर्षांनी अटक

रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! असे धर्मांध पोलीस हे पोलीस म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे तरी आहेत का ? अशांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा करायला हवी !

आसाममध्ये बांगलादेशी घुसखोराला अटक

सीमेवर ४ सहस्र २०० रुपये देऊन भारतात प्रवेश केल्याची स्वीकृती : परदेशी नागरिकांना अशा प्रकारे घुसखोरी करू देणारा जगातील एकमेव देश भारत ! बांगलादेशींना भारतात घुसखोरी करण्यास साहाय्य करणार्‍या देशद्रोह्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !


Multi Language |Offline reading | PDF