प.पू. भक्तराज महाराज जन्मशताब्दी वर्ष विशेषांक

इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) हे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु होत. ७ जुलै २०१९ ते ७ जुलै २०२० हे वर्ष प.पू. बाबांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक

जो शिष्याला वैराग्य देऊ शकतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण करू शकतो, तोच खरा सद्गुरु ! (एकनाथी भागवत) शिष्याने कोणती साधना करावी ते गुरु जाणतात. त्याला नुसती साधना सांगून ते थांबत नाहीत, तर त्याच्याकडून साधना करवून घेतात. हेच गुरूंचे खरे शिकवणे असते.

रणझुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना जामीन संमत !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयकडून (केंद्रीय अन्वेषण विभाग) जाणीवपूर्वक गोवले गेलेले आणि अन्याय्य पद्धतीने अटक करण्यात आलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना  पुणे येथील विशेष न्यायालयाने ५ जुलैला जामीन संमत केला.

गुरु श्री अनंतानंद साईश यांची देहभान विसरून सेवा केलेले आदर्श शिष्य प.पू. भक्तराज महाराज !

संतांची सगुण सेवा करणे कठीण असते. त्यातून अवलिया संतांची सेवा करणे त्याहून कठीण असते. क्षणोक्षणी साधनेची आणि शिष्याच्या निष्ठेची परीक्षाच असते. प.पू. बाबांनी शब्दशः देहभान विसरून गुरुसेवा केली.

अपेक्षा उंचावणारा अर्थसंकल्प !

मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अर्थसंकल्पाच्या आरंभीच भारतीय अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या क्रमांकावर असून ती तिसर्‍या क्रमांकावर आणण्याचा मानस व्यक्त केला.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर, मोरटक्का आणि कांदळी या आश्रमांतील छायाचित्रात्मक स्मृती !

शिष्याच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी तेजाने घालवणार्‍या श्रीगुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! शिष्याचे अज्ञान घालवून त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी जे शिष्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूतीही देतात, त्यांना ‘गुरु’ म्हणतात.

केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी लोकसभेत ५ जुलै या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.

देशातील मद्यसेवन करणार्‍या १६ कोटी लोकांमध्ये ५ कोटी ७० लाख लोक व्यसनी

देशातील १६ कोटी लोक मद्यसेवन करतात. त्यातील ५ कोटी ७० लाख लोकांना दारूचे व्यसन आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आली. अधःपतनाकडे जलदगतीने जात असलेले भारतीय ! जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम !


Multi Language |Offline reading | PDF