गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक

गंगेमुळे पाप, शशी (चंद्रा) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात. – श्री गुरुचरित्र १३:१३०

पावसामुळे चिपळूण येथील तिवरे धरण फुटून २३ जण वाहून गेले

१९ वर्षांपूर्वी बांधलेले धरण फुटतेच कसे ? धरणाचे निष्कृष्ट बांधकाम करणार्‍या आणि धरणाच्या सद्यःस्थितीकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात नारळ वाढवण्यास बंदी

प्रत्येक वेळी हिंदूंच्याच प्रथा-परंपरांवर बंदी आणून त्यांच्या श्रद्धा पायदळी का तुडवल्या जातात ? हिंदूंनी या विरोधात संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवायला हवा !

मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही ! – राहुल गांधी

मी आधीच त्यागपत्र दिले असल्याने काँग्रेसच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक घेऊन नव्या अध्यक्षाची निवड करावी, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

बंगालमध्ये सरकारी योजनांचा लाभ घेणार्‍यांना तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना २०० ते २५ सहस्र रुपये द्यावे लागतात ! – नागरिकांचा आरोप

हिंसाचारानंतर आता भ्रष्टाचारातही बंगालमधील तृणमूल काँग्रेस आघाडीवर !

गुजरातमध्ये गेल्या २ वर्षांत ८६३ हिंदूंनी धर्मांतरासाठी अनुमती मागितली

इतक्या मोठ्या संख्येने हिंदू धर्मांतर का करत आहेत, याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतली पाहिजे आणि त्यांना यापासून परावृत्त केले पाहिजे ! हिंदूंना धर्मशिक्षण दिले, तरच धर्मांतराचे प्रकार थांबतील !

लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे पोलीस आणि प्रशासन सामान्य हिंदूंच्या तक्रारींचे काय करत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून होणार्‍या अत्याचारांमुळे येथील मुसलमानबहुल प्रल्हादनगरच्या लिसाडी गेट भागातील ४२५ पैकी १२५ कुटुंबांनी पलायन केले आहे.

अमेरिकेतील ‘व्होल फूड्स मार्केट’ने क्षमा मागण्याची अमेरिकेतील हिंदूंची मागणी

खाद्यपदार्थांमधील घटक हे गोमांस आणि डुकराचे मांस यांपासून बनवल्याचा संशय : अमेरिकेतील हिंदू तेथील पदार्थांमधील घटकांविषयी जितके सतर्क आहेत, तितके भारतातील हिंदू नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद ! धार्मिक भावनांविषयी सतर्क असणार्‍या अमेरिकेतील हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू काही बोध घेतील का ?


Multi Language |Offline reading | PDF