काश्मिरी हिंदूंची समस्या ही विश्‍वातील प्रत्येक हिंदूची समस्या ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘फर्स्ट थिंक टँक कॉन्क्लेव्ह : काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. तेथील हिंदूंवर वर्ष १९९० मध्ये झालेले अत्याचार आणि त्यांच्या समस्या या केवळ काश्मिरी हिंदूंच्या नाहीत, तर संपूर्ण विश्‍वातील हिंदूंच्या समस्या आहेत, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय  मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी व्यक्त केले.

तेलंगण राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांकडून महिला वनअधिकार्‍याला काठ्यांनी मारहाण

तेलंगणमधील सत्ताधारी पक्ष असणार्‍या तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएसच्या) कार्यकर्त्यांनी एका महिला वनअधिकार्‍याला काठ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा ‘व्हिडिओ’ही प्रसारित झाला आहे.

मेरठमधून एकाही हिंदूचे पलायन नाही ! – योगी आदित्यनाथ यांचे स्पष्टीकरण

उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील प्रल्हादनगरमधून एकाही हिंदूने पलायन केलेले नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत दिले. ते म्हणाले की, आमची सत्ता असतांना हिंदूंनी पलायन करावे ….

अल्लाच्या मार्गावरून दूर जात असल्याने चित्रपटांत काम न करण्याची अभिनेत्री झायरा वसीम यांची घोषणा

चित्रपटांत काम करणे इस्लामविरोधी असल्याचे सूतोवाच : एका हिंदु अभिनेत्रीने धर्मासाठी चित्रपटात काम करणे सोडले असते, तर तिला ‘बुरसटलेली’ म्हणून हिणवण्यात आले असते; मात्र सदर अभिनेत्री मुसलमान असल्यामुळे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि व्यक्तीस्वातंत्र्यवाले तिच्या निर्णयाविषयी बोलायला सिद्ध नाहीत !

काश्मीरमध्ये १ आतंकवादी ठार, तर दुसर्‍याचे धर्मांधांच्या सैन्यावरील दगडफेकीमुळे पलायन

चांदुरामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केेले; मात्र दुसरा आतंकवादी सुरक्षादलाच्या कारवाईच्या वेळी त्यांच्यावर दगडफेक करणार्‍या धर्मांधांमुळे पळून गेला.

तिहार कारागृहातून अजय चौटाला या नेत्यासह २५ बंदीवानांकडून भ्रमणभाष संच जप्त

देशाच्या राजधानीतील आणि देशातील प्रमुख कारागृहांपैकी एक असलेल्या कारागृहात ही स्थिती असेल, तर अन्य कारागृहात कशी स्थिती असेल, याची कल्पना येते !

अनुदानाच्या अभावी महाराष्ट्रात औषधी वनस्पती लागवडीची योजना रखडली !

औषधी वनस्पतींचे जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन अशा वनस्पतींची लागवड करणे अत्यावश्यक आहे. यासाठी सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि औषधी वनस्पतींचे महत्त्व जनतेला पटवून देणे आवश्यक आहे !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेचा वाराणसीतील २०७ अधिवक्त्यांकडून निषेध

जनहितासाठी लढा देणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने मे २०१९ मध्ये अटक केली. अधिवक्ता पुनाळेकर यांच्या अटकेच्या विरोधात वाराणसी येथील धर्माभिमानी अधिवक्त्यांनी स्थानिक अधिवक्त्यांमध्ये जागृती केली आणि स्वाक्षरी मोहीम राबवली.

पाकिटबंद महागडे ‘ब्रॅण्डेड’ तांदूळ आरोग्यासाठी अपायकारक ! – संशोधकांचा दावा

पाकिटबंद ब्रॅण्डेड तांदळामुळे आरोग्य बिघडू शकते, अशी माहिती समोर आली आहे. मद्रास डायबिटीक रिसर्च फाऊंडेशनने (‘एम्डीआर्एफ्’ने) बाजारात मिळणार्‍या वेगवेगळ्या १५ पाकिटबंद तांदळाची चाचणी केली. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

अमेरिकेत श्री गणेशाचे चित्र असलेल्या योग चटईची विक्री क्रीडा आस्थापनाने थांबवली

येथील मियामी बीच स्थित ‘प्लॅटिनम सन इन्क’ या क्रीडा पोशाखाची निर्मिती करणार्‍या आस्थापनाने श्री गणेशाची प्रतिमा असलेली योग चटई विक्रीस उपलब्ध केली होती. हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या या विटंबनेचा अमेरिकेतील हिंदूंनी विरोध केला.


Multi Language |Offline reading | PDF