कोटी कोटी प्रणाम !

• अंगिरसऋषि जयंती
• संत निवृत्तीनाथ यांची आज पुण्यतिथी
• फरिदाबाद येथील सनातनच्या ४५ व्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनरायआजी यांचा आज (ज्येष्ठ कृष्ण पक्ष त्रयोदशी) वाढदिवस !

१५० पाद्य्रांचा कार्डिनल जॉर्ज यांना सहकार्य करण्यास नकार

हिंदूंच्या मंदिरामध्ये अपव्यवहार होत असल्याचे सांगत त्यांचे सरकारीकरण करणारे सरकार चर्च आणि मशिदी यांमध्ये होणार्‍या अपव्यवहारानंतर त्यांचे सरकारीकरण का करत नाहीत ? ‘लैंगिक अत्याचार करणारे किंवा घोटाळे करणारे पाद्री यांनाच व्हॅटिकन बढती देते’, असेच कार्डिनल यांच्या फेरनियुक्तीतून दिसून येते ! ‘हिंदूंच्या संतांवर टीका करणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ?

तुम्ही पाकिस्तान आणि सिरीया येथे राहू इच्छिता का ?

‘भारतात मुसलमान भीतीच्या छायेखाली वावरत आहेत’, असे चित्र निर्माण करू पहाणार्‍या मुसलमान महिला पत्रकाराला काँग्रेसचे माजी नेते आरिफ महमंद खान यांचा सडेतोड प्रतिवाद ! कोणत्याही इस्लामी देशांपेक्षा भारतातील मुसलमानांची स्थिती किती चांगली आहे, हे यावरून लक्षात येते !

जमावाच्या मारहाणीत ठार झालेल्या पहलू खान याच्यावर गोतस्करीचा ठपका ठेवत आरोपपत्र प्रविष्ट

२ वर्षांपूर्वी गोतस्करीच्या संशयावरून जमावाने केली होती हत्या ! पोलीस गोतस्करांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याने किंवा त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने जमावाचा उद्रेक होत आहे का, याकडेही सरकारने लक्ष द्यायला हवे !

कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करणे, हे काँग्रेसचे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र ! – खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

‘समझौता एक्सप्रेस’मधील बॉम्बस्फोट प्रकरणात चिदंबरम् यांनी याविषयी स्वत:च्या हाताने ‘अ‍ॅफिडेविट’ सिद्ध केले. मालेगाव बॉम्बस्फोटातही हाच प्रकार करण्यात आला. कर्नल प्रसाद पुरोहित यांना केवळ पुढे करण्यात आले. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसने हे षड्यंत्र केले. – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

निष्क्रीय पोलीस !

पोलीस स्वतःहून जुगार का रोखत नाहीत ? पोलीस आणि जुगारी यांचे साटेलोटे असल्याविना जुगार उघडपणे चालणे शक्य आहे का ?

शाहूवाडी (कोल्हापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर मुख्याध्यापकांकडून क्षमायाचना

शाहूवाडी तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात २६ जून या दिवशी शाहू जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात हिंदूंच्या देवता आणि ब्राह्मण यांच्यावर टीका करण्यात आली.

आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध कलाकृतीतून समाजासह वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात अन् त्यात सामाजिक परिवर्तन घडवण्याची क्षमता असते !

कलाकृतीतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा, म्हणजेच कलाकृतीचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की, आतापर्यंत कलाकृतींचे ज्या प्रकारे मूल्यांकन आपण केले आहे, ते पुन्हा करावे लागणार आहे.

औषधांमध्ये काळाबाजार करणार्‍या टोळीतील ११ जणांना अटक !- अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल

संरक्षण दल आणि शासकीय रुग्णालये यांना विनामूल्य देण्यात येणार्‍या औषधांमध्ये काळाबाजार करणार्‍या ११ आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील अन्वेषण चालू आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल

रिलायन्स आस्थापनाकडून भाडे न घेतल्याने २ सहस्र कोटी रुपयांचा महसूल बुडाला

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (एम्एम्आर्डीए) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या आस्थापनाला भूखंड देण्यात आला; मात्र याचे भाडे एम्एम्आर्डीएने रिलायन्सकडून वसूल केले नाही. त्यामुळे सरकारचा अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांचा….


Multi Language |Offline reading | PDF