उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये धर्मांधांच्या अत्याचारांमुळे १२५ हिंदु कुटुंबांचे पलायन

• पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचे आदेश : भारतात काश्मीरपाठोपाठ उत्तरप्रदेशातील कैराना आणि आता मेरठ येथे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येते, हे अतिशय गंभीर आहे. हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि बुद्धीवादी आता कुठे आहेत ?

जम्मू-काश्मीरमध्ये आणखी ६ मास राष्ट्रपती राजवट वाढवा !- गृहमंत्री अमित शहा यांचा लोकसभेत प्रस्ताव

जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट आणखी ६ मासांनी वाढवण्यात यावी, असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सादर केला. ‘या वर्षाच्या शेवटी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेणे शक्य होईल

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे २ पोलीस हुतात्मा

केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये २ पोलीस हुतात्मा झाले. तसेच यात एका गावकर्‍याचाही मृत्यू झाला.

भाजपचे नेते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांच्या हस्ते होणार कर्नल प्रसाद पुरोहित यांना न्याय देण्याची मागणी करणार्‍या संकेतस्थळाचे उद्घाटन

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या समर्थनार्थ २९ जून या दिवशी दुपारी ३ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात ‘विराट हिंदुस्थान संगम’ ! या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून एका शूर सैन्य अधिकार्‍याला पाठिंबा दर्शवावा’, असे आवाहन या कार्यक्रमाचे समन्वयक अधिवक्ता एस्. बालकृष्णन् यांनी केले आहे.

आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांनी एकत्र यावे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आतंकवाद केवळ निष्पाप लोकांचे बळीच घेत नाही, तर आतंकवादामुळे विकासाची गती आणि सामाजिक समानता यांवरही परिणाम होतो. आतंकतवाद हा माणुसकीचा सर्वांत मोठा शत्रू आहे. या समस्येशी लढणे, हे आपल्यापुढील आव्हान आहे.

श्रीमद्भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक श्री. अनंत आठवले  सनातनच्या १०१ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

सर्वांकडून सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असलेले आणि साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणारे श्रीमद्भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तीर्थरूप अनंत बाळाजी आठवले (ती. भाऊकाका) (वय ८३ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा करण्यात आली.

ज्योतिषशास्त्र – वेदांचे अंग !

सहा वेदांगांपैकी ज्योतिष हे एक अंग आहे. ऋग्वेदात ज्योतिषशास्त्राचे ३६, यजुर्वेदात ४४, तर अथर्ववेदात १६२ श्‍लोक आहेत. यावरून ज्योतिषशास्त्राचा वेदांशी दृढ संबंध आहे, हे सिद्ध होते; म्हणून ज्योतिषशास्त्राला खोटे म्हणणे म्हणजे ‘वेद खोटे आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी !

१६ जुलै २०१९ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची गुणवैशिष्ट्ये येथे प्रकाशित करत आहोत.

अमली पदार्थांवरील कारवाईसाठी मनुष्यबळ आणि निधी वाढवणार ! – गृहराज्यमंत्री रणजित पाटील

मुंबई शहरातील अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वतीने अमली पदार्थाविषयी गुन्ह्यांना आळा घालण्यात येत आहे. या कक्षाची ५ पथके आणि मुंबई पोलीस यांच्या वतीने एकूण ९ सहस्र ३२३ सेवनार्थींवर कारवाई करण्यात आली आहे.

मानसिक आरोग्य कायदा करून डॉक्टरांची संख्या वाढवणार ! – एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री

राज्यात मानसोपचारतज्ञांच्या जागा रिक्त आहेत, ही वस्तूस्थिती आहे. राज्यात ६८ मानसिक विकारतज्ञ सेवा देत असून १० लाख लोकसंख्येमागे केवळ ३ मानसोपचारतज्ञ आहेत.


Multi Language |Offline reading | PDF