गोरक्षणाच्या वेळी हिंसाचार करणार्‍यांना ३ वर्षे कारावास आणि दंड करण्याची तरतूद

गोतस्करांना ‘अभय’ देणारे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारचे नवीन विधेयक ! यापुढे हिंदुद्वेषी काँग्रेसच्या राज्यात धर्मांध गोतस्कर आणि गोमांसभक्षक यांनी गोरक्षकांच्या विरोधात खोट्या तक्रारी प्रविष्ट केल्या आणि त्या आधारे त्यांना कारागृहात डांबण्यात आले, तर आश्‍चर्य वाटणार नाही !

पाकिस्तानने भारतात आतंकवादी कारवाया करणे बंद करावे ! – अमेरिका

अमेरिकेने अशी कितीतरी वेळा विधाने केली आहेत; मात्र त्याचा किंचितही परिणाम पाकिस्तानवर झालेला नाही आणि पुढेही होणार नाही !

लुधियाना (पंजाब) येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांकडून हाणामारी

‘काँग्रेसच्या राज्यात कारागृहातील बंदीवानही गुन्हेगारी करण्यास धजावतात’, हे लक्षात घ्या ! ‘कारागृहातील बंदीवानांकडे गोळीबार करण्यासाठी बंदुका कशा पोचल्या ?’, ‘अधीक्षकांची गाडी जाळण्याचे त्यांचे धाडस कसे झाले ?’ या प्रश्‍नांची उत्तरे काँग्रेस सरकारने दिली पाहिजेत !

एअर इंडियाचे विमान लंडनमध्ये उतरवले

एअर इंडियाचे मुंबईहून अमेरिकेतील नेवार्कच्या दिशेने प्रयाण केलेल्या बोईंग ७७७ या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यामुळे या विमानाला लंडनच्या स्टॅनस्टीड विमानतळावर उतरवण्यात आले.

गेल्या ५ वर्षांत वायूदलाची ३३ विमाने अपघातग्रस्त

संपतकाळात वायूदलाची विमाने अपघातग्रस्त होणारा जगातील एकमेव देश भारत ! सैन्यदलाचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करत असतांना सैनिकांना उत्कृष्ट दर्जाची सामग्री मिळेल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे !

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील कारागृहातील बंदीवानांकडे पिस्तुले असल्याचे व्हिडिओ प्रसारित

येथील कारागृहातील बंदीवानांचे ४ व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाले आहेत. यात २ बंदीवानांच्या हातात पिस्तुले आहेत. तसेच काही बंदीवान कारागृहात मांसाहार करत आहेत आणि अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचेही यांत दिसत आहे.

हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील श्रीमती सीता श्रीधर जोशीआजी (वय ९४ वर्षे) सनातनच्या १०० व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

भोळा भाव असलेल्या, देहभान विसरून देवाची भक्ती करणार्‍या आणि प्रत्येक क्षणी कृतज्ञताभावात रहाणार्‍या हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील श्रीमती सीताबाई श्रीधर जोशीआजी (वय ९४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या १०० व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या आहेत.

बळजोरीने धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनरी संस्थांचा अस्तित्वासाठी संघर्ष

केरळमध्ये बळजोरीने धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनरी संस्थांचा सध्या अस्तित्वासाठी संघर्ष चालू झाला आहे. विदेशातून निधीपुरवठा होणार्‍या अशा अवैध अशासकीय संस्थांवर केंद्रशासनाने कडक निर्बंध लादले आहेत.

इराकमध्ये भारतीय दुतावासाला प्रभु श्रीरामचंद्र आणि हनुमानाची लेणी, तसेच शिल्पे अन् भित्तीचित्रे आढळली

भारतीय राजदूत प्रदीपसिंह राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ जूनमध्ये इराक येथे गेले होते. यासाठी उत्तरप्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागांतर्गत येणार्‍या अयोध्या शोध संस्थानने विनंती केली होती.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवले !

येथील श्री महालक्ष्मी परिसरातील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने हटवण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF