वर्ष १९८० ते २०१० या काळात ३४ लाख कोटींहून अधिक काळा पैसा भारताबाहेर गेला !

गेल्या ९ वर्षांत किती काळा पैसा भारताबाहेर गेला असेल, याची कल्पना करता येत नाही. त्या तुलनेत किती काळा पैसा भारतात आला, याची कुठलीही आकडेवारी समोर आलेली नाही, हे लक्षात घ्या ! एवढ्या प्रचंड प्रमाणात असलेला काळा पैसा भारतात आणल्यास देशातील गरिबी हटेल आणि विकासकामांना गती येईल !

सनातन संस्थेवर बंदीचा कोणताही प्रस्ताव नाही !

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रश्‍नावर केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्तर : दक्षिण भारतातील, विशेषतः केरळमधील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून सातत्याने जिहादी कारवाया केल्या जात असतांना तिच्यावर बंदी घालण्याविषयी असदुद्दीन ओवैसी प्रश्‍न का विचारत नाहीत ?

(म्हणे) ‘मी हिंदू आहे’, असे म्हणणार्‍याच्या तोंडावर ठोसे मारल्यावर त्याला सत्य काय ते कळेल !’

धर्मांध बिशप इझरा सर्गुणम यांची दर्पोक्ती ! सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचा डांगोरा पिटणारे या विधानाविषयी तोंड उघडतील का ? ‘प्रेम आणि शांती यांचे पुजारी’ म्हणून ओळखले जाणारे पाद्री समाजात विष कालवण्याचा आणि समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करतात, हे जाणा !

कोलकातामधून इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना अटक

कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेच्या महंमद जियाऊर रहमान, ममूर राशिद, महंमद सहीन, रोबिइल इस्लाम या ४ आतंकवाद्यांना अटक केली आहे.

भारतातून निर्यात होणार्‍या भाज्या आणि फळे विकत घेण्यास साम्यवादी नेपाळ सरकारचा नकार

नेपाळ पूर्णतः चीनच्या कह्यात गेल्याचे हे द्योतक आहे ! भविष्यात नेपाळच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनने भारतविरोधी कारवाया केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! नेपाळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार आल्यापासून तेथे भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत, त्याचे हे उदाहरण !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान

‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’, असा भाव दाटून आलेला वैष्णवजनांचा मेळा आणि विठूरायाच्या स्मरणात देहभान हरपून ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषावर ताल धरणारे विठ्ठलभक्त, अशा भक्तीमय वातावरणात प्रतिवर्षीप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीने २५ जूनला सायंकाळी प्रस्थान ठेवले.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनावर ५ जुलैला निकाल

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अटक केलेले अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनाचा (अर्जाची) निकाल ५ जुलै या दिवशी देण्यात येणार आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील संकटांच्या निवारणार्थ रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात ‘बगलामुखी याग’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील संकटांच्या निवारणार्थ जेष्ठ कृष्ण पक्ष षष्ठी अर्थात् २३ जून २०१९ या दिवशी येथे ‘बगलामुखी याग’ करण्यात आला. या यागाचे पौरोहित्य…..


Multi Language |Offline reading | PDF