बंगालमधील बुद्धीवादी हे भित्रे आणि सरकारकडून लाभ मिळवणारे ! – भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची टीका

बंगाल हिंसाचाराने धुमसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. तृणमूल काँग्रेसचे गुंड राज्यात हिंसाचार करत असतांना समाजातील बुद्धीवादी मूग गिळून गप्प आहेत.

‘आर्टिकल १५’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही ! – अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

हिंदू जागरूक नसल्यामुळेच आज चित्रपट, नाटके, विज्ञापने आदींच्या माध्यमातून हिंदु धर्म, देवता, संत, ब्राह्मण यांची सातत्याने नालस्ती आणि विडंबन केले जाते. जन्महिंदू या धर्महानीकडे मनोरंजन म्हणून पहातात. ही धर्महानी थांबण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

डीआरडीओच्या आश्‍वासनानंतर इस्रायलसमवेतचा क्षेपणास्त्र करार भारताकडून रहित

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआर्डीओने) दिलेल्या आश्‍वासनानंतर भारताने इस्रायलमधील आस्थापन ‘राफेल अ‍ॅडव्हान्स डिफेन्स सिस्टिम’समवेत केलेला ५० कोटी डॉलर्सचा (३ सहस्र ४७० कोटी ८७ लाख रुपयांचा) ‘स्पाइक’ क्षेपणास्त्र खरेदीचा करार रहित केला आहे.

मुझफ्फरपूर (बिहार) येथील मेंदूज्वराविषयी ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा !

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत १५० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे.

चंद्राबाबू नायडू यांचे ५ कोटी रुपये मूल्याचे निवासस्थान पाडण्यात येणार

सत्तेत आल्यानंतर लोकप्रतिनिधी मनमानी कारभार करतात आणि पाच वर्षांनंतर सत्तेत अन्य पक्ष आल्यानंतर आधीच्या नेत्यांनी उभारलेली अशी बांधकामे पाडतात ! या मनमानी कारभारात जनतेचा पैसा वाया जातो, त्याचे काय ? हा पैसा संबंधितांकडून वसूल करा !

बंगालच्या कांकिनारा परिसरातून ५० गावठी बॉम्ब जप्त

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल गावठी बॉम्ब बनवण्याचा कारखाना झाला आहे आणि त्याचा सातत्याने वापर करून हिंसाचार करण्यात येत आहे. अराजक माजलेल्या बंगालमध्ये केंद्र सरकारने तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक !

जनतेचे रक्षण न करणार्‍या सर्वच पोलिसांना निलंबित करा !

‘काँग्रेसचे पणजी (गोवा) येथील वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्या प्रचाराचे फलक पणजी शहरात लावण्यात आले होते.

रावळपिंडी येथील पाक सैन्याच्या रुग्णालयातील बॉम्बस्फोटात मसूद अझहर घायाळ

पाकच्या रावळपिंडी शहरातील सैनिकी रुग्णालयात बॉम्बस्फोट होऊन त्यात १० जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

मनामध्ये पांडुरंगाच्या भेटीची आस, मुखी ज्ञानोबा-तुकोबा यांचा जयघोष, हातात भगवी पताका आणि टाळ-मृदुंगांचा ठेका अशा भक्तीमय वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २४ जून या दिवशी देऊळवाड्यातून प्रस्थान झाले.


Multi Language |Offline reading | PDF