गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषीमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.                         

(म्हणे) ‘धर्माच्या नावावर होणारी हिंसा रोखण्यात मोदी सरकार अपयशी !’ – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल

गेली काही शतके स्वतःच्या देशातील चालू असलेला वर्णद्वेषी हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या अमेरिकेने भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसू नये ! अमेरिकेने रेड इंडियन यांचा (अमेरिकेतील मूळ निवासी) वंशसंहार करून तेथे वसाहत निर्माण केली, हा इतिहास कोणी विसरलेले नाहीत, हे तिने नेहमीच लक्षात ठेवावे !

नेहरू यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूच्या चौकशीचा आदेश दिलाच नाही ! – भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा आरोप

इतिहास साक्षी आहे की, देशभरातून मागणी होत असतांनाही जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचा आदेश तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी दिला नाही, असा आरोप भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनावरील सुनावणी २५ जूनला होणार

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीन आवेदनाची (अर्जाची) सुनावणी २५ जून या दिवशी होणार आहे.

रामटेक (नागपूर) येथील गडमंदिरात अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता आनंद जयस्वाल यांचा उच्च न्यायालयात अर्ज

रामटेक येथील गडमंदिरात प्रतिदिन शेकडो भाविक दर्शनासाठी जातात; मात्र मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल घेतली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांची हानी होत आहे, तसेच मंदिर परिसरात अनेकांनी अवैध बांधकामे आणि अतिक्रमण केले आहे.

वैद्यकीय आस्थापन कायदा करण्याच्या संदर्भात अभ्यास करून निर्णय घेऊ ! – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

वैद्यकीय आस्थापन कायदा (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०) करण्याच्या संदर्भात अभ्यास करून निर्णय घेतो, असे आश्‍वासन आरोग्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले.

गोव्यात पारपत्राविना रहाणार्‍या परदेशी तरुणीविषयी माहिती नसणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे शोधणार ?

‘कळंगुट (गोवा) पोलिसांनी २८.४.२०१९ च्या रात्री कळंगुट येथील वेश्याव्यवसाय चालत असलेल्या एका ‘गेस्ट हॉऊस’वर धाड घातली. विशेष म्हणजे या धाडीत पोलिसांनी अफगाणिस्तानातील वरिष्ठ शासकीय अधिकारी महंमद ओमर अरियन (वय २८ वर्षे) याला कह्यात घेतले.

शोपियांमध्ये ४ आतंकवादी ठार

३-४ आतंकवाद्यांना ठार मारून काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही; कारण दुसरीकडे काश्मिरी धर्मांध तरुण पाकपुरस्कृत आतंकवादी संघटनांमध्ये भरती होतच आहेत. त्यामुळे पाकला नष्ट केल्यावरच काश्मीर आणि संपूर्ण भारतातील आतंकवाद नष्ट होईल !

आषाढी एकादशीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा एकाच वेळी करण्याचे विचाराधीन ! – डॉ. दीपक म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची महापूजा एकाच वेळी करण्याचा विचार चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF