गुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक

वेद, शास्त्र, स्मृती वगैरेंच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः  त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.

अखेर ‘एबीपी माझा’ने क्षमा मागितली

सावरकरप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या लढ्याचा विजय ! सावरकरप्रेमींनी दिलेली निवेदने आणि केलेली आंदोलने यांमुळे ‘एबीपी माझा’ने क्षमा मागितली. आर्थिक दबाव आला नसता, तर वाहिनीने काहीच केले नसते. त्यामुळे आता मागितलेल्या क्षमेवरून वाहिनीची मानसिकता पालटली आहे, असे नाही. याहीपुढे ते . . .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी

केरळच्या गुरुवायूर मंदिरात धमकीची नोट सापडली : राष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ पहाणार्‍या भारताच्या पंतप्रधानांच्या जिवावर कोण उठले आहे ? हे भारतीय जनतेला कळायला हवे ! तसेच धमकी देणार्‍यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून चीननिर्मित शक्तीशाली स्टीलच्या गोळ्यांचा वापर

काश्मीरमध्ये जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी चीननिर्मित स्टीलच्या गोळ्यांचा वापर करतात, हे १२ जूनच्या चकमकीत आतंकवाद्यांच्या गोळीबारातून उघड झाले. आतंकवाद्यांना पाकसह चीनचेही साहाय्य मिळणे धोकादायक !

धुळे येथे गोरक्षकांवरील प्राणघातक आक्रमणाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा

येथील  ७० ते ८० धर्मांधांनी १८ जून २०१९ च्या रात्री रात्री ९ च्या सुमारास गोरक्षक श्री. विकास गोमसाळे आणि श्री. मयूर विभांडीक या गोरक्षकांची रिक्शा अडवून त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले.

अमेरिकेने सैनिकी कारवाई केली, तर इराणला महागात पडेल ! – रशिया

इराणने त्याच्या सीमेत घुसखोरी केल्याचा दावा करत अमेरिकेचे ड्रोन विमान २० जूनला पाडले. यावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ‘अमेरिकेने सैनिकी कारवाई केल्यास ते इराणला महागात पडेल’, अशी चेतावणी दिली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अन् सरकार यांच्यावर ओढलेल्या ताशेर्‍यांचे मुख्यमंत्र्यांकडून खंडण

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांच्या  खटल्यांविषयी उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री आणि सरकार यांच्यावर जे ताशेरे ओढण्यात आले आहेत, त्याविषयी न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये (ऑर्डर) कोणताही उल्लेख नाही; कारण न्यायालयाने दिलेला निर्णय महत्त्वाचा असतो.

नक्षलसमर्थकांचा स्वतः ‘राजकीय कैदी’ असल्याचा कांगावा

शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी झालेली चिथावणीखोर एल्गार परिषद आणि नंतर घडलेली कोरेगाव भीमा येथील दंगल यांप्रकरणी अटकेत असलेल्या नक्षलसमर्थकांनी स्वतःला ‘राजकीय कैदी’ संबोधत स्वत:च्या सुटकेची मागणी केली आहे.

इंग्रजांनी अन्यायकारी आणि कूट नीतीने प्राचीन भारतातील समृद्ध शेतीला उद्ध्वस्त केले !

भारतीय शेतकर्‍यांच्या कष्टाने पिकलेले धान्य दुसर्‍या महायुद्धात स्वतःसाठी वापरले गेले. एक-दोन दुष्काळ सोडले, तर अन्य सर्व दुष्काळ इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणांमुळे पडले. त्यात लक्षावधी लोक भुकेमुळे मेले.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या

आमच्या ग्रामस्वराज्य पद्धतीमुळे लक्षावधी वर्षे खेड्यांची स्वयंपूर्णता जोपासली होती. मुसलमानी राजवटीत शेतसार्‍यासाठी तापल्या तव्यावर उभे करण्यापासून खड्ड्यात घालीपर्यंत हाल सहन करूनही शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नाहीत. इंग्रजांनी भारतीय परंपरेचा पाया उखडून शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले.


Multi Language |Offline reading | PDF