गुरुपौर्णिमेला २५ दिवस शिल्लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह तेलंगण पोलिसांच्या लाठीमारात घायाळ !

वीरांगना राणी अवंतीबाई लोध यांचा विद्रूप पुतळा पालटण्याचा प्रयत्न : प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह हे येथील पोलिसांनी केलेल्या मारहाणीत घायाळ झाले. मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या तेलंगण राष्ट्र समिती पक्षाच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर होणारी आक्रमणे हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्र अपरिहार्य करतात !

राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात ‘घंटानाद’ आंदोलन

झुंझार राष्ट्रभक्त अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सुटकेची मागणी : अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्या अटकेचा निषेध अन् त्यांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी २० जून या दिवशी येथील आझाद मैदानात समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना २३ जूनपर्यंत सीबीआयची कोठडी

न्यायालयाने अधिवक्ता पुनाळेकर यांना २३ जूनपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सीबीआयकडून पराचा कावळा करत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा आरोप

महाराष्ट्राची कुलदेवता श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात घोटाळा करणार्‍या सूत्रधारांना शासनाने त्वरित अटक करावी ! – आमदार डॉ.(सौ.) नीलम गोर्‍हे, शिवसेना

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील घोटाळा : मागील १५ वर्षे अन्वेषण चालू असूनही अद्याप सूत्रधार सापडलेले नाहीत. त्यामुळे मंदिरातील घोटाळ्याचे अन्वेषण गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडीकडे) सोपवावे, – शिवसेनेच्या आमदार डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन ! – संजय पवार, शिवसेना

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधी कोल्हापुरात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

सातारा येथे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गोवंश तस्करांचे पलायन

येथील सदरबझार परिसरातील लक्ष्मी टेकडी येथे २ वाहनांमधून पशूवधासाठी २८ गोवंशांना अवैधरित्या कोंबून आणण्यात येत होते. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी धीरज कुंभार यांनी गोतस्करांना हटकल्यावर त्यांनी कुंभार यांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे १२ गोवंशियांची हत्या रोखली

येथील बाजारातून पाच बैल आणि सात गायी विकत घेऊन धाराशिव येथे हत्येसाठी नेल्या जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. १७ जून या दिवशी पहाटे चारच्या सुमारास १२ गोवंशियांना दाटीवाटीने टेम्पोमध्ये भरून टेंभुर्णीमार्गे नेत असल्याचे गोप्रेमींना आढळून आले.


Multi Language |Offline reading | PDF