गुरुपौर्णिमेला २६ दिवस शिल्लक

गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरःसर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.  

राष्ट्रप्रेमींकडून २३ जूनला ‘एबीपी माझा’च्या कार्यालयावर धडक मोर्चा

हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु समाज यांच्या विरोधात प्रत्येक वेळी गरळओक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला समस्त राष्ट्रप्रेमी हिंदू एकप्रकारे लोकशाही मार्गाने धडाच शिकवत आहेत. धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांची नाहक नालस्ती करणार्‍या अन्य वृत्तवाहिन्यांनी यातून बोध घ्यावा !

शबरीमला मंदिराजवळील प्रस्तावित विमानतळासाठी भूमी देणार नाही ! – केरळमधील ‘बिलिव्हर्स चर्च’

भाविकांच्या सोयीसाठी विमानतळ उभारण्याचे नियोजन : आता बिलिव्हर्स चर्चवाल्यांना कोणी ‘विकासविरोधी’ का ठरवत नाही ? हिंदूंच्या संघटनेने ख्रिस्त्यांच्या संदर्भात असा निर्णय घेतला असता, तर एव्हाना पुरो(अधो)गाम्यांनी आकाश-पाताळ एक केले असते !

‘आर्टिकल १५’ चित्रपटातून जातीच्या आधारे समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ! – अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदेकडून आरोप करत नोटीस

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) चित्रपटांना प्रमाणपत्र देतांना या गोष्टी लक्षात कशा येत नाहीत ? कि ते जाणीवपूर्वक अशा गोष्टींना मान्यता देते ?

वाहन परवान्यासाठी शिक्षणाची अट रहित ! – नितीन गडकरी

समाजातील अशिक्षित किंवा अल्पशिक्षित युवकांना इच्छा असूनही वाहनचालक म्हणून रोजगार उपलब्ध होत नाही; कारण वाहनचालकाचा परवाना काढण्यासाठी ८ वी इयत्ता उत्तीर्ण असणे बंधनकारक केले होते.

नाणार (जिल्हा रत्नागिरी) येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित करणार ! – मुख्यमंत्री,

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित वादग्रस्त ‘तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प’ आता रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील प्रश्‍नोत्तरात लेखी स्वरूपात दिली आहे.

श्रीलंकेतील तमिळींच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तेथील ‘तमिळ नॅशनल अलायन्स’ला निमंत्रण

श्रीलंकेत बौद्धांकडून सर्वाधिक अत्याचार हा तमिळी हिंदूंवरच होतो. तेथील तमिळी ख्रिस्तीही हिंदूंनाच छळतात. श्रीलंकेतील तमिळी प्रश्‍न हा तेथील तमिळी हिंदूंशी निगडित आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने श्रीलंकेतील तमिळींचा प्रश्‍न सोडवण्यासाठी तेथील हिंदुत्वनिष्ठांशीच संपर्क करणे आवश्यक आहे !

मंदिरांना अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करणारे पोलीस मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यास का कचरतात ?

ध्वनीप्रदूषणाच्या विषयी उर्वरित तक्रारींवर कारवाई करण्यास इतका विलंब का ?’, असा प्रश्‍न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले.

अधिवक्ता पुनाळेकर यांच्या जामिनावरील सुनावणीच्या वेळीच सीबीआयकडून त्यांच्या ५ दिवसांच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयकडून अन्याय्य पद्धतीने अटक झालेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीनअर्जावरील सुनावणीच्या वेळी (१९ जून या दिवशी) सीबीआयने अधिवक्ता पुनाळेकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी अर्ज केला.


Multi Language |Offline reading | PDF