गुरुपौर्णिमेला २८ दिवस शिल्लक

सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण फक्त त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच अखेर योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.

विखे-पाटील यांची निवड योग्य प्रक्रियेप्रमाणेच ! – मुख्यमंत्र्यांचा खुलासा

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री बनलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात विरोधकांच्या घोषणा

आर्थिक पाहणी अहवाल अडीच टक्क्यांनी वाढवून सांगण्यात आला आहे ! – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप

देशाचा आर्थिक पाहणी अहवाल फुगवून सांगण्यात आला असल्याचा आरोप देशातील १०८ अर्थतज्ञांनी केला आहे.

शबरीमला मंदिराच्या जागेवर लावलेले अवैध क्रॉस काढून टाकण्याचा महसूल अधिकार्‍याचा आदेश

हिंदूंनी ‘ॐ’ किंवा अन्य काही धार्मिक चिन्हे अवैधरित्या लावली असती, तर केरळमधील साम्यवादी सरकारने ती लावू दिली असती का ? हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळी क्रॉस लावण्याचे धाडस होतेच कसे ? या कायदाद्रोहाविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी काही बोलतील का ?

सुलभीकरणाच्या नावाखाली ‘बालभारती’कडून संख्या वाचण्याच्या पद्धतीत पालट

जोडाक्षर न वापरता संख्या वाचण्याची सूचना : यातून गणिताची गुणवत्ता न्यून होणार नाही का ? मुलांना अवघड वाटते; म्हणून संख्या म्हणण्याच्या पद्धतीत पालट करण्याऐवजी मुलांना ते म्हणता यावे, यासाठी ‘बालभारती’कडून मुलांची तशी सिद्धता का करून घेतली जात नाही ?

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर उडवण्याची धमकी

खोडसाळपणा करण्यासाठी हिंदूंचीच मंदिरे ‘सॉफ्ट टार्गेट’ वाटतात का ? तसेच या घटनेत आरोपीचे नावही उघड करण्यात आलेले नाही. त्याने धमकीच्या संदेशात वापरलेले शब्द पहाता हा तरुण धर्मांध असावा, असा संशय जनतेला आल्यास चूक ते काय ?

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीनअर्जावरील सुनावणी १९ जूनला होणार

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीनअर्जावर १७ जून या दिवशी सीबीआयकडून युक्तीवाद पूर्ण न झाल्याने न्यायाधीश आर्.एम्. पांडे यांनी पुढील सुनावणी १९ जून या दिवशी ठेवली आहे.

काश्मीरमध्ये सैन्यविरोधी आंदोलनांसाठी पाक अर्थपुरवठा करत होता ! – फुटीरतावादी आसिया अंद्राबी हिची स्वीकृती

काश्मीरमध्ये सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात महिलांची आंदोलने घडवून आणण्यासाठी पाक अर्थपुरवठा करत होता, अशी स्वीकृती काश्मीरमधील फुटीरतावादी आणि आतंकवादी कारवाया करणारी आसिया अंद्राबी हिने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांना चौकशीच्या वेळी दिली आहे.

लोकप्रतिनिधींनी राष्ट्राला तेजस्वी इतिहास शिकवावा !

‘जगज्जेते असलेल्या इंग्रजांवरही पूर्वी रोमनांनी ११०० वर्षे राज्य केले होते; मात्र स्वतंत्र झाल्यावर इंग्रजांनी आपल्या राष्ट्राला स्वतःच्या पराजयाचा इतिहास शिकवला नाही, तर स्वतःच्या विजयाचाच इतिहास शिकवला.


Multi Language |Offline reading | PDF