गुरुपौर्णिमेला २९ दिवस शिल्लक

जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात. मग ते उत्तम प्रकारे तत्त्वबोध देऊन संसाररूपी दुःखसागरातून त्या शिष्यांचा उद्धार करतात. – आद्यशंकराचार्य  

कायदा करून राममंदिर उभारा ! – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

देशातील जनतेने केंद्रामध्ये गेल्या वेळेपेक्षा अधिक सशक्त सरकार निवडून दिले आहे. याचाच अर्थ ‘अयोध्येत राममंदिर व्हावे’, ही जनतेची भावना आहे.

पुलवामामध्ये पुन्हा आतंकवादी आक्रमण होऊ शकतेे !

पाकिस्ताननेच भारताला दिली माहिती : अशी माहिती देऊन पाक ‘आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात भारताला सहकार्य करत आहोत’, असे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ! पाकने दिलेली माहिती खोटीही असू शकते किंवा आतंकवादी दुसर्‍याच ठिकाणी आक्रमण करणार असतील, हेही नाकारता येत नाही !

कनिष्ठ डॉक्टर्स ममता बॅनर्जी यांच्याशी सशर्त चर्चेला सिद्ध; मात्र संप अद्याप चालूच

बंगालमध्ये कनिष्ठ डॉक्टरांनी मंत्रालयात जाऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करण्याऐवजी जाहीररित्या आणि प्रसारमाध्यमे यांंच्या उपस्थितीत चर्चा करण्याची अट घातली आहे. तसेच ‘बैठक कधी आणि कुठे घ्यायची, हे ममता बॅनर्जी यांनीच ठरवावे’, असेही म्हटले आहे.

नेपाळच्या काही खासगी शाळांमध्ये ‘मंदारीन’ ही चिनी भाषा शिकवणे अनिवार्य

नेपाळमध्ये राजकीय हस्तक्षेप केल्यानंतर आता चीन तेथील संस्कृती आणि भाषा यांच्यावरही आघात करून नेपाळी हिंदूंना सांस्कृतिक गुलाम करण्याचा प्रयत्न करत आहे. हे पहाता भारताने याकडे गांभीर्याने पाहून हे रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

भूत उतरवण्याच्या नावाखाली आझम नावाच्या बाबाकडून तरुणीवर अनेकदा बलात्कार

भाग्यनगर येथील बोराबांदा भागामध्ये १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणार्‍या आझम नावाच्या बाबाला अटक करण्यात आली आहे. या मुलीमध्ये असणारे भूत उतरवण्यासाठी त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.

भारत-म्यानमार सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यांकडून आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्त कारवाई

भारत आणि म्यानमार यांच्या सैन्याने केलेल्या संयुक्त कारवाईत सीमेवर असणार्‍या आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले.

संतसाहित्य श्राव्य (ऑडिओ) स्वरूपात उपलब्ध होणार !

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा आणि नामदेव गाथा हे ग्रंथ श्राव्य (ऑडिओ) स्वरूपात उपलब्ध केले जाणार आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत संपूर्ण कुटुंबावर साधनेचे संस्कार करणार्‍या डोंबिवली येथील श्रीमती विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे) या सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये खचून न जाता संघर्ष करत आणि सर्व लोटलीकर कुटुंबियांवर साधनेचे संस्कार करत त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणार्‍या श्रीमती विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे) या सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रक्षादंड स्थापना आणि लवणपर्वत पूजा !

‘सनातन संस्थेवर आलेली संकटे दूर व्हावीत, तसेच साधकांना होणारे सर्व प्रकारचे त्रास दूर व्हावेत’, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात ३ जून २०१९ या सोमवती अमावास्येच्या दिवशी जम्मू येथील डॉ. शिवप्रसाद रैनागुरुजी यांनी सांगितल्यानुसार ….


Multi Language |Offline reading | PDF