गुरुपौर्णिमेला ३१ दिवस शिल्लक

गुरुकृपा सतत हवी ! गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करत रहाणे आवश्यक असते.

‘पितांबरी उद्योग समूह’, ‘सुहाना मसाला’ आणि ‘अमृत मलम’ यांच्याकडून सावरकरद्वेष्ट्या ‘एबीपी माझा’ला विज्ञापने देणे बंद !

हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु समाज यांच्या विरोधात प्रत्येक वेळी गरळओक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला समस्त हिंदूंनी आणि राष्ट्रप्रेमींनी एकप्रकारे लोकशाही मार्गाने धडाच शिकवला आहे. राष्ट्रप्रेमी आणि हिंदुप्रेमी जागृत झाल्यावर ते काय करू शकतात, याची ही झलक आहे !

पानसरे हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार दूर; पण अद्याप मारेकर्‍यांचाही शोध लागलेला नाही ! – न्यायालयाने केला असंतोष व्यक्त

पानसरे हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार तर दूरच; पण अद्याप मारेकर्‍यांचाही शोध लागलेला नाही, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईविषयी असंतोष व्यक्त केला.

बलात्काराच्या प्रकरणात जामिनावर असलेले केरळमधील माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावरील व्यंगचित्रावर ‘केरळ कॅथॉलिक बिशप परिषदे’चा आक्षेप

शबरीमला प्रकरणात हिंदूंच्या धर्मभावना लाथाडणारे केरळमधील साम्यवाद्यांचे हिंदुद्वेषी सरकार ख्रिस्त्यांसमोर मान झुकवते ! मुलक्कल यांच्यावरील व्यंगचित्रामुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी आवाज उठवणार्‍या ‘केरळ कॅथॉलिक बिशप परिषदे’ने मुलक्कल यांच्या घृणास्पद कृत्याचा कधी निषेध केला आहे का ?

पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावापुढील ‘वीर’ शब्द काढला

काँग्रेसने सावरकर यांच्या नावापुढे असलेला ‘वीर’ हा शब्द काढला, तरी त्यांच्या शौर्याला ते कधीही संपवू शकत नाहीत ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी गाजवलेले शौर्य कोट्यवधी भारतियांना नेहमीच प्रेरणादायी ठरलेे आहे आणि हे काँग्रेस कधीही नष्ट करू शकत नाही !

छत्तीसगडमध्ये चकमकीत २ नक्षलवादी ठार

अशा २-३ नक्षलवाद्यांना मारणे पुरेसे नसून नक्षलवादाचा पूर्ण निःपात करणे आवश्यक !

आजचे दिशाहीन आणि निस्तेज युवक !

योग्य आदर्श नसल्याने अधिकाधिक आळशी आणि व्यसनाधीन

इंटरनेटच्या अतीवापराने तरुणांना ‘नेटब्रेन’ या नवीन रोगाने ग्रासणे !

एका सर्वेक्षणानुसार जगातील अनुमाने २० कोटी लोकांना इंटरनेटच्या अनावश्यक वापराची वाईट सवय लागलेली आहे. यांत सर्वांत अधिक प्रमाण तरुणांचे असल्यामुळे ते ‘नेटब्रेन’ नावाच्या नवीन व्याधीने ग्रासित होत आहेत.

‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

वापरा आणि फेका (Use and Throw)’ ही जी पाश्‍चात्त्यांची आधुनिक संस्कृती आहे, ती आता अनेक तरुणांंनीही आत्मसात केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF