गुरुपौर्णिमेला ३२ दिवस शिल्लक

बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात. ते विचार शिष्याच्या उन्नतीसाठी पोषक असल्यास गुरु त्यानुसार वागतात.

संप करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करण्याची ममता बॅनर्जी यांची धमकी

कोलकाता येथे धर्मांधांकडून २० हून अधिक डॉक्टरांना मारहाण झाल्याचे प्रकरण : ‘डॉक्टरांवर आक्रमण करण्यासाठी २ ट्रक भरून आलेल्या धर्मांधांवर कठोर कारवाई करू’, असे ममता(बानो) बॅनर्जी बोलत नाहीत; मात्र न्यायाची मागणी करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करण्याची धमकी देतात, हे लोकशाही निरर्थक ठरल्याचे द्योतक !

ओमानमधील १७ भारतीय कैद्यांची सुटका

ओमानचे सुलतान कुबूस यांनी तेथे शिक्षा भोगत असणार्‍या १७ भारतीय कैद्यांची सुटका केली आहे. त्यांना ईदनिमित्ताने ‘शाही माफी’ देण्यात आली आहे.

छत्तीसगडमधील १२२ गावे अद्यापही अंधारात !

स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षांत भारताने केलेली ‘प्रगती’ ! एकीकडे भारत चंद्रावर जाण्याच्या योजना आखतो आहे, तर दुसरीकडे देशातील अनेक गावे अद्यापही अंधारात आहेत, हा विरोधाभास नको !

केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन् यांच्यावर सामाजिक माध्यमातून टीका करणार्‍या १३८ जणांवर गुन्हे नोंद

ही साम्यवाद्यांची हुकूमशाही होय ! मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ! एरव्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन आदींची बाजू घेणारे याविषयी का बोलत नाहीत ?

अकोला येथे लाच घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचार्‍यावर गोळी झाडली !

भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस ! भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कृत्ये करणारे पोलीस अधिकारी असलेली पोलीस यंत्रणा जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? यावरून अशा पोलिसांना कशा प्रकारचे शिक्षण दिले जाते, हाच प्रश्‍न आहे !

शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा ‘पशूवैद्यक’ असा उल्लेख !

पाठ्यपुस्तक मंडळाचा भोंगळ कारभार आणि अज्ञान उघड ! ‘सुश्रुत’ यांची शल्यचिकित्सा हा याच प्राचीन सनातन हिंदु संस्कृतीचा एक अत्यंत अभिमानास्पद वारसा आहे. असे असतांना त्यांचा उल्लेख पशूवैद्यक म्हणून करून पाठ्यपुस्तक मंडळाने त्यांचा अवमानच केला आहे. 

महापौरांकडून एमआयएमच्या ६ नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रहित !

खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावाकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी १३ जूनला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ घातला. या वेळी त्यांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला.

‘कॉटन किंग’ आस्थापनाकडून ‘एबीपी माझा’ला विज्ञापने न देण्याचा निर्णय

‘स्वातंत्र्यवीर सावरकर नायक कि खलनायक ?’ अशा मथळ्याखाली त्यांची अपकीर्ती करणारा कार्यक्रम ‘एबीपी माझा’ने सादर केला.


Multi Language |Offline reading | PDF