गुरुपौर्णिमेला ३५ दिवस शिल्लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते. 

बंगालमधील स्थिती आणखी बिघडल्यास तेथे राष्ट्रपती राजवटीची आवश्यकता भासेल ! – केसरीनाथ त्रिपाठी, राज्यपाल, बंगाल

बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यपालांकडून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अहवाल सादर : बंगालची केव्हाच काश्मीरच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे. तेथे आणखी किती स्थिती बिघडल्यावर राष्ट्रपती राजवट लागू करणार ?

म्यानमार १० लाख रोहिंग्या शरणार्थींना परत घेण्यास इच्छुक नाही !- बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना

म्यानमार हा बांगलादेशामध्ये आश्रयासाठी आलेल्या तेथील १० लाख रोहिंग्या मुसलमांना परत घेण्यास इच्छुक नाही, असा आरोप बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे.

अभ्यासदौर्‍याच्या नावाखाली मणीपूर येथे गेलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराचा तरुणीसमवेत अश्‍लील नृत्य करतांनाचा ‘व्हिडिओ’ प्रसारित

अनेक आमदार, खासदार, मंत्री देश-विदेशात अभ्यासदौर्‍याच्या निमित्ताने जात असतात; मात्र ते नेमका काय अभ्यास करतात आणि त्याचा लाभ जनतेला किती होतो, हे अद्यापपर्यंत एक कोडेच राहिले आहे ! त्यामुळे आता या व्हिडिओतून हे ‘अभ्यासदौरे असे असतात का’, असे जनतेला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे १२ वर्षांच्या मुलीवर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार

येथे एका १२ वर्षांच्या मुलीवर ६ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपींचे आणि पीडित मुलीच्या कुटुंबियांचे नाल्याच्या बांधकामावरून भांडण झाले होते.

सुव्यवस्थापन आणि नीतीनिश्‍चिती हा हिंदु राष्ट्राचा पाया ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सुव्यवस्थापन आणि नीतीनिश्‍चिती हा हिंदु राष्ट्राचा पाया आहे. प्रत्येक कृती परिपूर्ण करणे, हे सुव्यवस्थापनाचेच एक अंग आहे. दूरदृष्टीने विचार करण्याची सवय असेल, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातात.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या सुटकेसाठी जयपूर येथील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनकडून केंद्रीय गृहसचिवांना निवेदन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात अन्याय्य अटक करण्यात आलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची सुटका करावी, यासाठी येथील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना केंद्रीय गृहसचिवांना देण्यासाठीचे निवेदन सादर केले.

कुंपणानेच शेत खाल्ले, तर दाद कोणाकडे मागणार ?

निघोज (जिल्हा नगर) येथील किराणा मालाच्या गोदामावर एका टोळीने दरोडा टाकला. टोळीचा प्रमुख हा स्वतः पोलीस असल्याचे समोर आले आहे.

मंगळूरू आणि केरूर येथे हिंदू एकता दिंडी, तर विजयनगर येथे माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त मंगळूरू येथे चैतन्यदायी वातावरणात नुकतीच हिंदू एकता दिंडी काढण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF