१५ जूूनला उद्धव ठाकरे आणि नवनिर्वाचित १८ खासदार रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत जाणार

१५ जून या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि नवनिर्वाचित १८ खासदार अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर मासामध्ये श्री. उद्धव ठाकरे सहस्रो शिवसैनिकांसमवेत अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी गेले होते.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांची हत्या

बंगालमधील लोकसभेची निवडणूक संपली, तरी तेथील हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. राज्यातील कुचबिहार आणि उत्तर डमडम येथे तृणमूल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.

भूमी बळकावण्याच्या संशयावरून आदिवासींनी नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना बाण मारून पळवून लावले !

बिहार-बंगाल राज्यांच्या सीमेवर धुलबरी गावात काही मुसलमान येथील चहाच्या मळ्यात नमाजपठणासाठी गेले होते. तेव्हा येथील आदिवासींना वाटले की, ते त्यांची भूमी बळकावण्यासाठी आले आहेत. त्यामुळे आदिवासींनी धनुष्य बाणांद्वारे मुसलमानांवर आक्रमण केले.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध जाहिदकडून ३ वर्षीय हिंदु मुलीची बलात्कार करून हत्या

येथे ३ वर्षीय हिंदु मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी जाहिद याला, तर हत्या करण्यास सहाय्य केल्याच्या प्रकरणी अस्लम यालाही अटक करण्यात आली.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची अटक रहित होईपर्यंत देशभर आंदोलन चालूच ठेवणार ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

जनहितासाठी लढा देणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ८ मासांपूर्वीच्या एका खोट्या आरोपाखाली अटक करून सीबीआयने सूड उगवला आहे.

बुरख्यावर बंदी घाला ! – अभिनेत्री कोईना मित्रा

सुरक्षेच्या कारणावरून बुरख्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी अभिनेत्री कोईना मित्रा यांनी ट्वीट करून केली आहे. त्यांनी यासमवेत एक व्हिडिओही ‘पोस्ट’ केला आहे.

हजेरी लावण्यासाठी एखाद्या व्यक्तीस विलंब झाला; म्हणून त्याला काठीने मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणत्या कायद्याने दिला आहे ?

‘बेळगाव (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम बनगे यांना ११.३.२०१९ या दिवशी चिक्कोडी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी हवालदारांनी दूरभाष करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले होते.

नालासोपारा येथील पोलीस उपनिरीक्षकाला लाच स्वीकारतांना अटक

एका गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी त्याच्याकडून १० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या नालासोपारा येथील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ३ जून या दिवशी अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF