मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात ‘मंदिर-संस्कृती रक्षण अभियान’ उभारणार ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत केले प्रतिपादन ! सेक्युलरपणाच्या आडून आधुनिक गझनी बनलेल्या या सरकारी प्रतिनिधींना मंदिरांतून बाहेर काढून मंदिरे हिंदु समाजाकडे देणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘मंदिर-संस्कृती रक्षण अभियान’ – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित सुटका करा ! – गोवा येथे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची ‘सीबीआय’कडे मागणी

ही अटक म्हणजे कायद्याने दिलेला ‘पक्षकार-अधिवक्ता’ संवादाचा विशेषाधिकार हिरावून घेण्याचा प्रकार ! ‘पक्षकार-अधिवक्ता’ या संबंधाचे शोषण करण्याच्या प्रकाराला त्वरित आळा घालणे आवश्यक आहे.

गुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक

‘गुरु विश्‍वासावर आहेत. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहेत. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहेत.

भाजप सरकार प्रथम कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्यानंतर वर्ष २०२४ मध्ये राममंदिराचे बांधकाम चालू करील ! – रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती

. . . म्हणजेच पुढील लोकसभेच्या निवडणुकीतही राममंदिर बांधण्याचे सूत्र असणार, हे यातून स्पष्ट होते !

‘सीबीएस्ई’च्या पाठ्यपुस्तकात हिंदु धर्मियांना हीन लेखण्याचे, तर अल्पसंख्यांकांचे उदात्तीकरण करण्याचे षड्यंत्र !

सीबीएस्ईच्या शिशू वर्गाच्या पाठ्यपुस्तकात हिंदु धर्मियांना हीन लेखण्याचे, तर मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाजपने स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ दाखवण्यासाठी असे केले आहे का ?’ असा प्रश्‍न हिंदूंना पडल्यास आश्‍चर्य वाटू नये !

संभाजीनगर येथील निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर (वय ७४ वर्षे) आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) संतपदी विराजमान !

अधिवेशनात आतापर्यंत घोषित झालेल्या ५ संतांपैकी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी हे सर्वजण न्यायालयीन क्षेत्राशी संबंधित असल्याने आता हिंदु राष्ट्र स्थापनेचा न्यायालयीन लढा लवकरच पूर्णत्वाला जाऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याचा संकेतच या माध्यमातून मिळाला.

श्रीरामाप्रती उत्कट भाव असणारे आणि राममंदिर उभारण्यासाठी तन, मन, धन अन् प्रसंगी प्राणही समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन (वय ६५ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. हरि शंकर जैन यांच्या संतपदाची घोषणा झाली, तेव्हा भावजागृती होऊन त्यांना भावाश्रू आले. अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी पू. नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना वाकून नमस्कार केला. 

परम पूज्य गुरुजींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला हा सन्मान मिळाला !

संतपदी विराजमान झाल्यानंतर पू. (अधिवक्ता) हरि शंकरजी जैन म्हणाले, ‘‘आजचा क्षण अतिशय आनंददायी आहे. परम पूज्य गुरुजींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला हा सन्मान दिला. या सन्मानामुळे माझे दायित्व अधिक वाढले आहे.

अनेक तरुणांसाठी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन हे ऋषितुल्य आणि आधारस्तंभ आहेत ! – पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१६ मध्ये ‘एक भारत अभियाना’च्या अंतर्गत एका सभेच्या आयोजनासाठी मी आणि काही साधकांनी पू. हरि शंकर जैन यांच्यासोबत आयोजनाची सेवा केली. तेव्हा त्यांच्यातील उत्तम नियोजनकौशल्य, आयोजनक्षमता, समयमर्यादांचे पालन करणे, उत्कृष्ट संघटन आदी गुणांचे दर्शन झाले.

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

मला कळू लागले, तेव्हापासून वडिलांना कधीही राष्ट्र आणि धर्म सोडून अन्य विषयांवर बोलतांना मी पाहिलेले नाही. त्यांनी फिरायला जाणे, सिनेमा पहाणे इत्यादी कृती कधीही केल्या नाहीत.


Multi Language |Offline reading | PDF