‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून पाखंडी विचारांचे खंडण करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून वैचारिक योद्ध्यांची निर्मिती : अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात पहिल्यांदाच ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते.

इस्लामाबाद येथे भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीतील पाहुण्यांना पाकिस्तानने धमकावून परत पाठवले !

भारतातील पाकच्या उच्चालयाकडून काश्मीरमधील फुटीरतावाद्यांसमवेत बैठक आयोजित केली जाते आणि भारत त्याकडे निष्क्रीयपणे पहात रहातो ! अशा भारताला पाककडून अशा प्रकारची वागणूक मिळत असेल, तर आश्‍चर्य ते काय !

(म्हणे) ‘जमावाकडून मुसलमानांच्या कत्तली केल्या जात आहेत !’ – समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क यांचा कांगावा

काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना मशिदींमधून धमक्या देऊन पळवून लावण्यात आले, तर सहस्रो हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, तसेच अनेक हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. अजूनही हिंदू काश्मीरध्ये रहाण्यासाठी जाऊ शकत नाहीत, याविषयी बर्क का बोलत नाहीत ?

भाजपचे कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पोस्टकार्ड ममता बॅनर्जी यांना पाठवणार !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’ या घोषणेला शिव्या म्हटल्याने, तसेच ‘जय श्रीराम म्हणणार्‍यांची चामडी सोलून काढू, त्यांना कारागृहात डांबू’, असे विधान केल्याने भाजपने ममता बॅनर्जी यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

झारखंडमध्ये ५ नक्षलवादी ठार, तर १ सैनिक हुतात्मा

येथे २ जून या दिवशी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार, तर १ सैनिक हुतात्मा झाला. या चकमकीत ४ सैनिक घायाळ झाले.

गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक

गुरूंच्या निर्गुण आणि सगुण रूपांची सेवा
अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे.

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील साध्या वेशातील पोलिसांचा अधिवेशनस्थळी वावर !

रामनाथी, गोवा येथे २९ मेपासून ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला. मागील ७ वर्षे हे अधिवेशन अत्यंत शांततेत आणि वैध मार्गानेच झाले असतांना अचानक यंदाच्या अधिवेशनाला पोलिसांनी प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा बसवली आहे.

‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’मध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रसारासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावी वापरासंदर्भात जागृती

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात आवाज उठवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. काळानुसार आपल्याकडे जी साधने आहेत, त्यांचा उपयोग करून हिंदु राष्ट्राची संकल्पना लोकांपुढे मांडली पाहिजे. सध्याच्या काळात न्यायालये, विद्यापीठ यांपासून प्रत्येक …..

सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेकडे इतर संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आकृष्ट होत असतांना ‘सनातन संस्था इतर संघटनांचे कार्यकर्ते पळवते’, असे म्हणणे हास्यास्पद !

‘मागील काही मासांपासून एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते सामाजिक माध्यमांवर ‘सनातन संस्था आमच्या संघटनेचे कार्यकर्ते पळवते’, ‘हायजॅक करते’ ‘उभ्या पिकावर डल्ला मारते’ असा अपप्रचार करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF