देवास (मध्यप्रदेश) येथे मशिदीमधून वरातीवर करण्यात आलेल्या दगडफेकीत एक हिंदू ठार, तर अनेक जण घायाळ

जवळच पोलीस ठाणे असतांना पोलीस निष्क्रीय : काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! तथाकथित गरीब आणि छळ झालेल्या अल्पसंख्यांकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करणार असलेले पंतप्रधान मोदी हे येथील हिंदूंचा विश्‍वास आता कसा संपादन करणार आहेत ?

कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस सरकारकडून राज्यात वेळेवर पाऊस पडण्यासाठी मंदिरांमध्ये मंदिराच्याच खर्चाने पूजा करण्याचा आदेश

पाऊस पडण्यासाठी चर्च किंवा मशिदी आदी अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये धार्मिक कृती केल्या जात नाहीत, तर हिंदूंच्या मंदिरांत केल्या जातात, यावरून मंदिरांचे आणि पूजाविधींचे महत्त्व लक्षात येते ! सरकारने हा खर्च मंदिरांकडून नाही, तर शासनाच्या तिजोरीतून केला पाहिजे !

काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाल्याचे सरकारने स्वीकारल्यासच त्यांचे पुनर्वसन शक्य ! – पनून कश्मीर

काश्मिरी हिंदूंसाठी काश्मीरमध्ये ‘पनून काश्मीर’ हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करून तेथे त्यांचे पुनर्वसन करावे, तरच काश्मिरी हिंदूंना आधार मिळून त्यांचे कायमचे पुनर्वसन होईल, असे प्रतिपादन ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांनी केले.

कोलकाता (बंगाल) येथील शास्त्र धर्म प्रचार सभेच्या ‘ट्रुथ’ साप्ताहिकाचे संपादक डॉ. शिवनारायण सेन (वय ७३ वर्षे) संतपदी विराजमान !

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धर्माभिमान्यांच्या संतत्वाच्या आणि उन्नतीच्या आनंदवार्तांची शृंखला चालूच ! एखाद्या नियतकालिकाचे संपादक संत झाल्याची दुर्मिळ घटना !

डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी अधिवक्ता पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

अधिवक्ता सुभाष झा यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निकालाचे दाखले देत ‘ही अटकच अवैध कशी आहे’, हे न्यायालयासमोर मांडले.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले विचार

हिंदू हिंसक असल्याचा चुकीचा आरोप केला जातो. तो तथ्यहीन आहे. जर हिंदू हिंसक असते, तर मुसलमान आणि ख्रिस्ती हिंदूंची गळचेपी करू शकले नसते. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदूंचे सैनिकीकरण आणि सैनिकांचे हिंदुकरण आवश्यक आहे.

भारतभूमी इतर देशांच्या तुलनेत अत्यंत सात्त्विक ! – शॉन क्लार्क, ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ संकेतस्थळाचे संपादक

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ.’ च्या (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन) वतीने विश्‍वभरात होणार्‍या हिंदु धर्मप्रसाराच्या संदर्भात ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ या संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉन क्लार्क यांनी माहिती सांगितली.

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ वणी (यवतमाळ) येथे निवेदन

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी २८ मे या दिवशी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावडे यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले.


Multi Language |Offline reading | PDF