(म्हणे) ‘अल्पसंख्यांंकांचा छळ झाला, आता त्यांचा विश्‍वास मिळवायचा आहे !’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताची फाळणी होऊन १० लाख हिंदूंची कत्तल झाली, काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना पळवून लावण्यात आले, सहस्रो जणांची हत्या झाली. आजही हिंदू तेथे राहू शकत नाहीत. असे असतांना ‘या देशात केवळ अल्पसंख्यांकांचा (मुसलमान, ख्रिस्ती आदींचा) छळ झाला’, असे विधान मोदी कसे करू शकतात ?

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी

सीबीआय चे षडयंत्र ! . . . याचा सरळ अर्थ हाच आहे की, ‘एक-एक करून कोणाला तरी आरोपी करत रहायचे. एक सनसनाटी निर्माण करायची. खटले चालवायचे नाहीत. आरोपी म्हणून व्यक्तीला कारागृहात सडवत ठेवायचे आणि अशा पद्धतीने ‘आम्ही काही तरी करत आहोत’, असा भ्रम निर्माण करायचा.

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी केरळच्या किनारपट्टीवरून भारतात घुसखोरी करण्याची शक्यता

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी नौकेतून लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. भारताला आतंकवादमुक्त करण्यासाठी त्याविरोधात कठोर धोरण अवलंबणे आवश्यक आहे !

तक्रार करून घेण्यास टाळाटाळ करणारे निष्क्रीय पोलीस !

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाच्या विरोधात विवेक तांबे यांनी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास असमर्थता दर्शवली. तांबे हे राणी लक्ष्मीबाई यांच्या वारसांपैकी एक आहेत.

आज ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हिंदु जनजागृती समिती आयोजित, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ….

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी श्री शांतादुर्गादेवी आणि श्री देव रामनाथ यांच्या चरणी श्रीफळ अर्पण, तर आश्रमात श्री गणेशपूजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे आणि त्याचा उद्देश सफल व्हावा’, यासाठी कवळे गोवा येथील श्री शांतादुर्गादेवी आणि रामनाथी येथील श्री देव रामनाथ यांच्या चरणी संकल्पपूर्वक श्रीफळ अर्पण केले.

विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले आणि दैवी गुण असलेले सांगली येथील संकेत कुलकर्णी सनातनच्या ९६ व्या संतपदी विराजमान !

स्वत:च्या अस्तित्वाने इतरांना साधनेला प्रवृत्त करणारे श्री. संकेत कुलकर्णी यांनी ९६ वे संतपद गाठल्याची घोषणा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २४ मे २०१९ या दिवशी येथील सनातन आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात केली.

पू. संकेत कुलकर्णी यांच्यातील वाढत्या चैतन्यामुळे त्यांचे घर आणि त्यांच्या आईची स्थिती यांत झालेले पालट

मनातील विचार अन् भीतीचे प्रमाण न्यून होणे आणि शारीरिक क्षमता वाढून घरातील सर्व कामे सहजतेने करता येणे अन् सकारात्मकता वाढणे

‘मीही पुनाळेकर’ असे फलक हातात धरलेली छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून हिंदुत्वनिष्ठांचा अधिवक्ता पुनाळेकर यांना खंबीर पाठिंबा !

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी ‘मीही पुनाळेकर’ असा फलक हातात धरून स्वत:ची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF