‘हिंदु राष्ट्रा’चा विचार करणार्‍या ‘हिंदु राष्ट्रवादा’चा विजय ! – अमेरिकेतील दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे वृत्त

वर्ष २०१४ मधील भाजपचा विजयही असाच होता; मात्र त्या वेळी भाजपने तो हिंदु राष्ट्रवादाचा विजय असल्याचे मानण्यास नकार देत तो विकासाच्या सूत्राचा विजय असल्याचे म्हटले होते. आता तरी काही दिवसांत सत्ता स्थापन करणार्‍या भाजप सरकारने हिंदु राष्ट्राचा उघड पुरस्कार करून हिंदूंना आश्‍वस्त करावे !

(म्हणे) ‘निराश होऊ नका, ही वेळही निघून जाईल !’

भाजपच्या विजयाच्या पार्श्‍वभूमीवर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे मुसलमानांना पत्र लिहून आवाहन ! भाजप पुन्हा सत्तेत आल्याने मुसलमानांना आणि त्यांच्या संघटनेला जर इतकेच त्रासदायक वाटत असेल, तर ते त्यांना ७१ वर्षांपूर्वी दिलेल्या देशात का जात नाहीत ?

राजकीय पक्षांची नावे धर्माच्या आधारे असू नयेत ! – देहली उच्च न्यायालयात याचिका

मुस्लिम लीग, हिंदु सेना आदी नावांवर आक्षेप : पक्षांची नावे पालटली, तरी त्यांच्या ध्येयधोरणांत पालट होणार का ?

भाजपचा एकूण ३०३ जागांवर विजय

१७ व्या लोकसभेच्या ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल पूर्णपणे लागला आहे. यात भाजपला ३०३ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या आहेत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या फलकांची भीती वाटणारे पोलीस !

‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भाविकांचे हार्दिक स्वागत’ असे लिखाण असलेल्या फलकांमुळे सुरक्षायंत्रणेला बाधा येत होती कि आणखी काय अडचण येत होती, हे पोलिसांनी सांगावे.

मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा देतांनाच पाककडून अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी

‘एअर स्ट्राईक’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ यांचा पाकवर विशेष काही परिणाम झालेला नाही, हे यातून दिसून येते. याउलट तो भारताची अधिकाधिक हानी करण्याची सिद्धता करत आहे, हे लक्षात घेऊन त्याच्यावर धडक कारवाई करणे आवश्यक !

विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले सांगली येथील संकेत कुलकर्णी संतपदी विराजमान !

विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले, तसेच परेच्छेने वागणे, सहनशीलता यांसह अनेक दिव्य गुण असलेले विश्रामबाग, सांगली येथील श्री. संकेत कुलकर्णी (वय ३० वर्षे) २४ मे या दिवशी ७१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठून ९६ व्या संतपदी विराजमान झाले.

३० मे या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता

भाजपला विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यागपत्र सादर केले आहे. त्यानंतर राष्ट्रपती यांनी त्यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे

ईश्‍वरावर दृढ श्रद्धा आणि विविध दैवी गुणांनी युक्त असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्रीमती कुसुम जलतारेआजी (वय ८० वर्षे) संतपदी विराजमान !

‘देवा, माझे मन तुला इतके शरण जावे । स्वभावदोष जाऊनी सगळे । त्याचे निष्पाप फूल व्हावे ॥’, अशी एक कवितारूपी प्रार्थना आहे. २२ मे या दिवशी साधकांना या कवितारूपी प्रार्थनेचे मूर्तीमंत रूप रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात अनुभवायला मिळाले !

पू. जलतारेआजी यांची कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

माझ्या आजीचे, म्हणजे आईच्या आईचे निधन झाले, तेव्हा आई केवळ १२ वर्षांची होती. तिला ३ भांवडे होती. तिचे वडील कर्मठ ब्राह्मण होते. त्यांना सोवळ्यामध्ये स्वयंपाक लागायचा. त्यांनी आईला तो शिकवला. आई इतर भावंडांचा अभ्यासही घ्यायची. विवाह झाल्यावर आईला सासूसासरेही कडक शिस्तीचे मिळाले.


Multi Language |Offline reading | PDF