हिंदु राष्ट्र साकार करण्यासाठी कृतीची पुढील दिशा ठरवणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

२७ मेपासून गोव्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन ! अधिवेशनात २०० हून अधिक हिंदु संघटनांचे ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार !

केंद्रीय अर्थमंत्री, संरक्षणमंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांचे भाडे थकवले !

भाडे थकवणार्‍यांना प्रशासनाने बंगल्याबाहेर का काढले नाही ? एखाद्या सामान्य व्यक्तीने भाडे थकवले, तर प्रशासन संबंधितांना त्यांच्या सामानासह बाहेर काढते, असे अनुभव जनतेने घेतले असतांना मंत्र्यांना सूट का ?

राष्ट्रहिताच्या आड आल्यास इराणला नष्ट करू ! – अमेरिकेची धमकी

अमेरिकेच्या राष्ट्रहिताच्या आड आल्यास इराणला नष्ट करू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे इराणला दिली आहे. गेली ३ दशके पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी भारताच्या सुरक्षेस बाधा ठरत आहेत. असे असतांना भारताने कधी पाकला अशी धमकी दिली आहे का ?

कमल हसन यांना अटकपूर्व जामीन संमत

मक्कल निधी मैय्यम पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते कमल हसन यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने अटकपूर्व जामीन संमत केला आहे.

‘लिट्टे’प्रमाणे इस्लामिक स्टेटलाही नष्ट करा ! – श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा सुरक्षादलांना आदेश

एक जिहादी आतंकवादी आक्रमण झाल्यावर श्रीलंका जिहादी आतंकवाद्यांना मुळासकट नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवाद चालू असतांना एकाही शासनकर्त्याने असा प्रयत्न केला नाही, हे लक्षात घ्या !

सतत वात्सल्यभावात असणार्‍या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान !

सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी मूळच्या देवरुख येथील आणि आता तपोधाम येथे सेवारत, तसेच सतत वात्सल्यभावात असणार्‍या श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) या सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.

पोलिसांची अकार्यक्षमता !

‘भिवंडी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बांधण्यात येणार्‍या पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून धर्मांधांनी ५.७.२००६ या दिवशी शहरात दंगल घडवली, असा आरोप रझा अकादमी या संघटनेवर आहे.

ताझिकिस्तानमधील कारागृहामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३२ जणांची हत्या, तर कारवाईत २४ आतंकवादी ठार

ताझिकिस्तानची राजधानी दुशांबे येथील एका कारागृहामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी चाकूद्वारे ३२ जणांची हत्या केली. यात २९ बंदीवान आणि ३ सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे.

मुंबईनगरीत भव्य हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून भक्ती, शक्ती आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम !

‘हिंदूंच्या राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील एकमेव उपाय म्हणचे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना !’ असा ज्वलंत विचार देऊन हिंदूंमधील धर्मतेज जागवणारे आणि हिंदूंना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीप्रवण करणारे हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे हिंदूऐक्याच्या प्रकट आविष्काराची पर्वणी !

परशुरामभूमी चिपळूण शहरात ‘हिंदु एकता दिंडी’ने दिला हिंदु राष्ट्राचा हुंकार !

हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि  समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांच्या वतीने १९ मे या दिवशी शहरातून ‘हिंदु एकता दिंडी’ काढण्यात आली. या दिंडीतून हिंदूऐक्य आणि हिंदु राष्ट्र यांचा हुंकार निनादला.


Multi Language |Offline reading | PDF