भारतीय सैन्याला कारखान्यांकडून सदोष शस्त्रे पुरवली जातात ! – सैन्याचा आरोप

भारतीय सैन्याला सदोष शस्त्रे पुरवली जात आहेत. त्यामुळे सैन्याची मोठी हानी होत आहे, असा आरोप सैन्याने शस्त्रे पुरवणार्‍या कारखान्यांच्या समितीवर (‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डा’वर) केला आहे. ‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डा’ने हे आरोप फेटाळले आहेत.

पैसा वाढला; म्हणून सुख वाढत नसते ! – जगातील तिसर्‍या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेट

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय, बफेट यांच्या विधानावरून तरी काही शिकतील का ?

(म्हणे) ‘नरेंद्र मोदी ‘नीच माणूस’, हे मी योग्यच बोललो होतो !’ – काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर

पाकिस्तानात जाऊन मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याविषयी चर्चा करणारे आणि पाकप्रेमी असलेले अय्यर यांना भाजपने आतापर्यंत कारागृहात न डांबल्याचा हा परिणाम होय !

हिंदु महासभेकडून अभिनेते कमल हसन यांना ठार मारण्याची धमकी

आता हिंदु महासभेवर बंदी घालण्याची मागणी केली जाईल; मात्र ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा. १०० कोटी हिंदूंना संपवतो’, असे म्हणणारे अकबरुद्धीन ओवैसी यांच्या एम्आयएम् पक्षावर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून भाजपच्या प्रचारामध्ये अडथळे

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही ! भाजपने देश आणि धर्म द्रोह्यांच्या विरोधात अशी हुकूमशाही राबवली असती, तर एव्हाना देशात शांतता निर्माण झाली असती !

‘होळी आणि रंगपंचमी या सणांच्या वेळी गाड्या अडवून बलपूर्वक पैसे मागणे थांबले पाहिजे’, अशी मागणी करावी लागते, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘कोकणामध्ये होळी आणि रंगपंचमी हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या उत्सवांचे विशेष आकर्षण असते; मात्र बर्‍याच ठिकाणी या उत्सवात अपप्रकार होतांना दिसतात.

‘भाजपप्रणीत आघाडीला ३०० जागा मिळतील’, असे भाकीत वर्तवल्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारकडून संस्कृतचे प्राध्यापक निलंबित

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणार्‍या मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारची मोगलाई ! काँग्रेसच्या या दडपशाहीच्या विरोधात एकही पुरो(अधो)गामी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे लेखक, अभिनेते आदी का बोलत नाहीत ?

हिंदु मुलीची छेड काढणार्‍या मुसलमान तरुणाला विरोध करणार्‍या पित्याची हत्या

देशातील वाढती असहिष्णुता ! गोहत्यांच्या प्रकरणांत जमावाकडून कसायांना होणार्‍या मारहाणीविषयी ऊर बडवणारे निधर्मीवादी, पुरो(अगो)गामी, हे धर्मांधांकडून हिंदूंच्या होणार्‍या हत्यांविषयी मात्र सोयीस्कर मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथील विविध मंदिरांत साकडे घालण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now