(म्हणे) ‘नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु आतंकवादी !’ – अभिनेते कमल हसन

कमल हसन यांना पंडित नथुराम गोडसे हे आतंकवादी वाटत असतील, तर ‘स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणारा रशिद कोण वाटतो’, हेही त्यांनी सांगायला हवे !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘कारागृहातून बाहेर येण्यासाठी इंग्रजांची क्षमा मागणारे’ असा उल्लेख

शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा भाजपवर आरोप करणार्‍या काँग्रेसकडून शिक्षणाचे ‘ब्रिटिशी’करण केले जात आहे ! यातून ‘काँग्रेस ब्रिटीशधार्जिणी आहे’, हे स्पष्ट होते ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खरा इतिहास वगळून चुकीचा इतिहास दाखवणारी काँग्रेस देशद्रोहीच होय !

श्रीलंकेत ३ मशिदी आणि मुसलमानांची दुकाने यांची तोडफोड

एक जिहादी आक्रमण झाल्यावर श्रीलंकेत ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ अशी पोपटपंची करण्यात आली नाही. याउलट थेट धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी जनता कायदा हातात घेऊन पुन्हा आतंकवाद्यांना आक्रमण करण्याचे धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

सनातनच्या संतांच्या मांदियाळीत आणखी ४ पुष्पे गुंफली !

सद्गुरुद्वयींना जन्म देणार्‍या मात्या-पित्यांनी एकाच वेळी संतपद गाठल्याची सनातनच्या इतिहासातील अविस्मरणीय घटना !

आनंदाची उधळण आणि हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणार्‍या दिंडीमुळे अवघी पुण्यनगरी चैतन्यमय !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त १२ मे या दिवशी आयोजित केलेली दिंडी अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडली.

मुंबई आणि नवी मुंबई येथे प्रवचनांद्वारे सांगण्यात आले ‘मनुष्यजीवनातील अध्यात्माचे महत्त्व !’

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मुंबई आणि नवी मुंबई या भागांत ठिकठिकाणी प्रवचने अन् अभ्यासवर्ग घेण्यात आले.

अंधश्रद्धेच्या नावाखाली आदिवासींच्या श्रद्धेवर घाव घालण्याचे अंनिसचे कारस्थान !

धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आदिवासी भागातील (अंध)श्रद्धा दूर करण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर येथे एका शाखेची स्थापना करण्याचे षड्यंत्र रचले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्पदंशापासून कुपोषणापर्यंत…..

नवी मुंबई येथील शिक्षकांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ शिबिर 

सध्या अतिमहत्त्वाकांक्षा, हव्यास आणि चुकीची मूल्ये समाजात रुजली आहेत. जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचा नकारात्मक परिणाम शिक्षकांवरही होत आहे. त्यामुळे शिक्षकांनाही शिकवतांना दडपण येते.

वाघाच्या अवयवांची तस्करी करणारे अटकेत !

वाघाच्या अवयवांची तस्करी करणार्‍या चार जणांना नागपूर वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. काळी जादू आणि जादूटोणा करण्यासाठी वाघाचे अवयव वापरले जात असल्याची माहिती समोर आली

जिहादी आतंकवादाविषयी बोला !

‘स्वतंत्र भारताचा पहिला आतंकवादी हा हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते’, असे विधान ‘मक्कल निधी मियाम’चे संस्थापक आणि अभिनेते कमल हसन यांनी केले आहे. सध्या निवडणुकीचे वारे चालू आहेत.


Multi Language |Offline reading | PDF