भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई न केल्याच्या प्रकरणी उपलोकायुक्तांचे महाराष्ट्र सरकारवर कडक ताशेरे

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) येथील नारायण तलावाच्या बांधकामातील भ्रष्टाचाराचे प्रकरण : यावरून आतापर्यंतच्या सर्व सरकारांना भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्याची किती इच्छा आहे, हे स्पष्ट होते ! पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजप सरकारला हे लज्जास्पद !

बालाकोटवरील कारवाईत १७० आतंकवादी ठार ! – इटलीच्या महिला पत्रकाराचा दावा

असे कितीही पुरावे दिले, तरी पाक त्याला भीक घालणार नाही. त्यामुळे ‘आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना’ असलेल्या पाकचा निःपात करणे, हाच एकमेव उपाय होय !

पाककडून होणाऱ्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘सिंधू जल करार’ मोडू ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चेतावणी

गेल्या ५ वर्षांत पाकने अनेक आतंकवादी आक्रमणे करूनही भाजपने हा करार का मोडला नाही ? आता करार मोडण्यासाठी सरकार कशाची वाट पहात आहे ? अशा चेतावणीमुळे ‘पाक आतंकवादी कारवाया थांबवील’, अशी अपेक्षा कधीतरी करता येईल का ?

अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांनी माओवाद्यांना नकाशे आणि पोलिसांच्या हालचाली यांची माहिती पुरवली ! – सरकारी अधिवक्त्या

देशात नक्षलसमर्थकांचे पिक फोफावले आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या कारवाया पहाता नक्षलसमर्थक आणि त्यांची पाठराखण करणारे तथाकथित विचारवंत यांच्यावर सरकार कठोर कारवाई करणार का ?

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकूमार्चन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी केलेल्या आज्ञेने श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकूमार्चन करण्यात आले.

काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर महिलेने चप्पल भिरकावली

जनतेच्या मनातील उद्रेक यातून दिसून येतो ! राजकारण्यांनी यातून बोध घेणे आवश्यक !

भारतीय सैन्यात प्रथमच ख्रिस्ती धर्मगुरूंची नेमणूक

ख्रिस्ती पाद्रयांचा धर्मांतराचा इतिहास पहाता, त्यांनी सैन्यातही असा उपद्रव केल्यास त्याला उत्तरदायी कोण ? रुग्णांना ‘भेटी’ देण्याच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मगुरु त्यांचे धर्मांतर करणार नाहीत कशावरून ? ख्रिस्ती पाद्रयांचा इतिहास तरी हेच सांगतो ?

इंदूर (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध गणेश मंदिरातील मूर्तीला भाजपच्या झेंड्याचा रंग असणारे वस्त्र नेसवले

हिंदूंना तसेच, ‘हिंदुत्वनिष्ठ’ असल्याचे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांना अन् कार्यकर्त्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते ! धर्मशिक्षण नसणारे असे पक्ष कधीतरी हिंदुत्वाचे कार्य करू शकतील का ?


Multi Language |Offline reading | PDF