(म्हणे) ‘रमझानच्या काळात आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाई थांबवावी !’

मेहबूबा मुफ्ती यांची या वर्षीही देशद्रोही मागणी : गेल्या वर्षी रमझानच्या काळात सैनिकी कारवाई थांबवून भाजप सरकारने सैन्याची कुचंबणा केली होती. या वेळी सरकारने राष्ट्रहितास प्राधान्य देऊन मुफ्ती यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवावी, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणांची ममता बॅनर्जी यांच्याकडून ‘शिव्या’ म्हणून हेटाळणी !

ममता(बानो) बॅनर्जी यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा या शिव्याच वाटणार ! अशांच्या विरोधात हिंदूंनी तक्रारी प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबण्यासाठी पोलिसांवर दबाव निर्माण केला पाहिजे !

मुंबईवरील जिहादी आतंकवादी आक्रमण पाकिस्तान आणि तत्कालीन काँग्रेस सरकार यांच्या संगनमताने झाले ! – माजी केंद्रीय गृहसचिव मणी यांचा दावा

गेली काही वर्षे हे सूत्र ते वारंवार उपस्थित करत आहेत; मात्र त्याची नोंद भाजप सरकारने तात्काळ घेतली नाही. हिंदूंनो, तुम्हाला ‘आतंकवादी’ ठरवू पहाणार्‍या संबंधित सर्व हिंदुद्वेष्ट्यांना कायद्याने शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसू नका !

श्रीलंकेतील जिहादी आतंकवाद्यांना केरळ आणि काश्मीर येथे प्रशिक्षण मिळाले होते ! – श्रीलंकेच्या सैन्यदलप्रमुखांची माहिती

हे भारतासाठी लज्जास्पद आहे ! भाजप सरकारने देशातील आतंकवादाचा समूळ नायनाट न केल्याचा हा परिणाम होय !

अवैध गोष्टी जनतेला दिसतात त्या सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांना का दिसत नाहीत ?

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे तमिळनाडू सरकार राज्यातील ४४ सहस्र मंदिरांमध्ये इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणार

शासनकर्ते अधर्मी असतील, तर राज्यावर पूर, दुष्काळ, टोळधाड, आक्रमण आदी संकटे येतात. त्यामुळे अशा शासनकर्त्यांना हटवून तेथे धर्माचरणी शासनकर्ते आणण्यासाठी हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्राला पर्याय नाही ! नास्तिकतावादी अण्णाद्रमुकसारख्या पक्षांना पाण्याच्या संकटाच्या वेळी हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या !

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात भावपूर्ण वातावरणात सौरयाग पार पडला !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांचे त्रास दूर व्हावेत, यांसाठी केला संकल्प !

संभाजीनगर येथील तीन साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाविषयीच्या मार्गदर्शनाच्या वेळी श्री. सत्यनारायण तिवारी, श्री. मधुकर देशमुख आणि सौ. शोभा मधुकर देशमुख यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी २९ एप्रिलला दिली.

अखंड सेवारत असणार्‍या आणि इतरांना साहाय्य करणार्‍या पुणे येथील सौ. सुलोचना कुंभार (वय ५० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चालू असणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती अभियानात साधक भरभरून आनंद आणि गुरुकृपा अनुभवत आहेत.

स्वतःला पालटण्याची तळमळ असलेल्या पुणे येथील सौ. सुलोचना कुंभार (वय ५० वर्षे) !

‘सौ. सुलोचना कुंभारकाकू (वय ५० वर्षे) अनेक वर्षे आमच्या घरी स्वयंपाकाची सेवा करण्यास येत असत. आमच्या घरी सातत्याने साधनेविषयी बोलणे ऐकून त्यांच्यातही साधनेची गोडी निर्माण झाली आणि त्यांनी साधनेला आरंभ केला.


Multi Language |Offline reading | PDF