राजकीय नेतेच नक्षलवाद्यांना दारूगोळा पुरवतात ! – हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या आईचा आरोप

याविषयी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना आणि सरकारला काय म्हणायचे आहे ? अशा नेत्यांना शोधून काढून सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का ?  आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी नक्षलवादाचा बीमोड न केल्यामुळेच हुतात्मा सैनिकांच्या नातेवाइकांकडून अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

गडचिरोली येथे घटनास्थळी ‘एके-४७’ रायफलच्या २ ‘मॅगझीन’ सापडल्या !

नक्षलवाद्यांनी १ मे या दिवशी भूसुरुंगाच्या घडवून आणलेल्या स्फोटात १५ सैनिक हुतात्मा झाले. या घटनेच्या तिसर्‍या दिवशी या परिसरात पोलिसांकडून शोधमोहीम चालू आहे. ३ मे या दिवशी सकाळी घटनास्थळी ‘एके-४७’ रायफलच्या २ ‘मॅगझीन’ (गोळ्या साठवण्याचे यंत्र) आढळल्या.

ख्रिस्त्यांना न्याय मिळाला नाही, तर ते कायदा हातात घेतील ! – श्रीलंकेतील चर्चच्या कार्डिनलची चेतावणी

ख्रिस्त्यांचे धर्मगुरु जिहादी आतंकवाद्यांनी प्रथमच ख्रिस्ती धर्मियांना लक्ष्य केल्यावर थेट अशा प्रकारची चेतावणी देतात, तर भारतात गेली ३ दशके हिंदूंवर जिहादी आतंकवादी आक्रमणे होत असतांनाही हिंदूंच्या धर्मगुरूंनी कधीही अशी चेतावणी दिलेली नाही. ‘हिंदू सहिष्णु आहेत’, हे पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?

(म्हणे) ‘रामायण आणि महाभारत यांतही हिंसा आहे; मग ‘हिंदू हिंसक नसतात’, असे कसे म्हणणार ?’ –  सीताराम येच्युरी

ज्या साम्यवाद्यांचे हात निरपराध लोकांच्या रक्ताने बरबटलेले आहेत, त्यांना ‘हिंदू हिंसक आहेत कि नाहीत ?’, हे बोलण्याचा काय अधिकार ? सत्ता, अधिकार यांसाठी सामान्यांची क्रूर हत्या करणार्‍या साम्यवाद्यांनी ‘अशी हत्या करण्याची शिकवण कुठल्या पुस्तकातून मिळाली’, हे प्रथम सांगावे !

जिहादी आतंकवादाचे समर्थक डॉ. झाकीर नाईक यांच्या संघटनेवर बंदी; मग त्यांच्या फेसबूक खात्यावर का नाही ? – हिंदु जनजागृती समिती

डॉ. झाकीर हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे जर भारत सरकारचे म्हणणे आहे, तर त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेच्या फेसबूक खात्यांवर सरकारने आजही बंदी का घातली नाही ? त्यांच्या संघटनेवर घातलेली बंदी ही दिखाऊपणाच म्हणावा लागेल !

काश्मीरमध्ये चकमकीत ३ आतंकवादी ठार

काश्मीरमधील शोपियां येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या चकमकीत एक सैनिक घायाळ झाला आहे. अशा प्रकारे १-२ आतंकवाद्यांना ठार करण्यापेक्षा त्यांचा निर्माता असणार्‍या पाकलाच नष्ट का केले जात नाही ?

ब्रिटनमध्ये कारावास भोगलेल्या महिला खासदाराचे सदस्यत्व नागरिकांकडून रहित

ब्रिटनमध्ये होऊ शकते, तर भारतात असे का होऊ शकत नाही ? भारतीय लोकशाही व्यवस्था ही ब्रिटीश कायद्यांवरच आधारित आहे ! भारतात असा कायदा झाल्यास अनेक खासदारांची हकालपट्टी झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

तेलंगण सरकार रमझानच्या मासात इफ्तारसाठी ८३२ मशिदींना प्रत्येकी १ लाख रुपये मूल्याच्या भेटवस्तू देणार

तेलंगणमधील तेलंगण राष्ट्र समिती पक्षाचे सरकार हिंदूंच्या सणांच्या वेळी राज्यातील मंदिरांना अशा प्रकारे भेटवस्तू देते का ? ही धर्मनिरपेक्षता आहे का ? असे निर्देश हिंदूंच्या सणांच्या वेळी बैठक घेऊन दिले जातात का ?

साई आणि रावे (जिल्हा रायगड) येथील ग्रामदेवतांचा जत्रोत्सव !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शौर्याने पावन झालेली पवित्र भूमी म्हणजेच रायगड ! अशा रायगड जिल्ह्यातील ‘कर्नाळा’ किल्ल्याच्या पश्‍चिमेस साधारणतः ५ किलोमीटर अंतरावर रावे आणि साई ही दोन गावे आहेत.


Multi Language |Offline reading | PDF