भूसुरुंग स्फोटानंतर ‘गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका’, अशा फलकांद्वारे नक्षलवाद्यांची सरकारला धमकी

आणखी किती सैनिक हुतात्मा झाल्यावर सरकार नक्षलवाद आणि आतंकवाद यांचा बीमोड करणार आहे ? किती काळ आपण नक्षलवाद्यांच्या धमक्या आणि दबाव यांना बळी पडणार आहोत ?

गेल्या १० वर्षांत नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात सुरक्षादलांचे अनुमाने १ सहस्र १५० सैनिक हुतात्मा

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिक हुतात्मा होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! कोणतेही सरकार आले, तरी ही स्थिती पालटणार नाही, असेच जनतेला आता वाटू लागले आहे. त्यामुळे आता हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) स्थापनेला पर्याय नाही !

मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली येथील हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली !

नक्षलवाद आणि आतंकवाद यांचा कायमचा बीमोड करणे, हीच हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल, हे शासनकर्ते जाणतील तो सुदिन !

रमझानच्या काळात मतदान सकाळी ७ ऐवजी ५ वाजता चालू करण्याविषयी निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा ! – सर्वोच्च न्यायालय

रमझानच्या काळात मतदान असतांना मुसलमानांना कुठलीही अडचण येऊ नये, याविषयी न्यायालय विचार करते; मात्र शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देतांना हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार होत नाही, हे कसे ?

(म्हणे) ‘जर बुरखाबंदी होणार असेल, तर ‘घुंगट’वरही बंदी घालावी !’ –  जावेद अख्तर यांची हिंदुद्वेषी मागणी

बुरखाबंदीची मागणी जिहादी आतंकवाद्यांना होणार्‍या लाभापासून रोखण्यासाठी असतांना त्याचा संबंध ‘घुंगट’शी लावून जावेद अख्तर धर्मांधताच पसरवत आहेत !

श्रीलंकेकडे वाकड्या दृष्टीने पाहू नका ! – श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांची इस्लामिक स्टेटचा प्रमुख आतंकवादी बगदादी याला चेतावणी

लहान देश असणारी श्रीलंका एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर ‘दुःख व्यक्त करतो’ किंवा ‘भ्याड आक्रमण’ असे चौकटीतील शब्द वापरण्याऐवजी थेट इस्लामिक स्टेटच्या प्रमुखाला चेतावणी देते. भारतीय शासनकर्ते यातून काही शिकतील का ?

केरळमधील मुसलमान महाविद्यालयात बुरखाबंदी

केरळच्या मल्लपूरम् या मुसलमानबहुल जिल्ह्यातील ‘मुस्लिम एज्युकेशन सोसायटी’कडून चालवण्यात येणार्‍या महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कोल्लम (केरळ) येथे अज्ञातांकडून ख्रिस्त्यांच्या चॅपेलची तोडफोड

केरळमधील माकपच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! आता माकपप्रेमी निधर्मीवादी लोक या विरोधात बोलणार नाहीत; मात्र हेच जर भाजपच्या राज्यात घडले असते, तर एव्हाना त्यांनी देश डोक्यावर घेतला असता !

भाजपला २२० किंवा २३० जागा मिळाल्या, तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

सत्तेसाठी जातीच्या आधारावर राजकारण करून समाजात विष कालवणार्‍या मायावती यांच्याशीही हातमिळवणी करण्यास सिद्ध असलेला तत्त्वहीन भाजप !


Multi Language |Offline reading | PDF