जांबूरखेडा (गडचिरोली) येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात १६ सैनिक हुतात्मा

‘हे भ्याड आक्रमण आहे’, असे चौकटीतील वाक्य प्रत्येक आक्रमणाच्या वेळी प्रत्येक शासनकर्ता म्हणत असतो; मात्र शासनकर्त्यांनी शौर्य दाखवून अद्यापपर्यंत नक्षलवाद का संपवला नाही, हे ते कधीच सांगत नाहीत ? यापुढेही अशी आक्रमणे होणार नाहीत, याची निश्‍चिती ते देऊ शकणार नाहीत, ही सुद्धा वस्तूस्थिती आहे !

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित

केवळ एखाद्या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित केल्याने आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत, हे लक्षात घ्यायाला हवे ! अशा कृतींपेक्षा ‘आतंकवाद्यांना आणि त्यांच्या प्रमुखांना नष्ट केल्याने आतंकवाद संपणार आहे’, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील तो सुदिन !

पाकिस्तानमध्ये पाय पसरून बसलेल्या तरुणीच्या चित्रावरून गदारोळ

पाकिस्तानमध्ये रुमिसा लखानी आणि रशीदा शब्बीर हुसैन या दोघ्या तरुणींनी आंतरराष्ट्रीय महिला दिवसासाठी बनवलेल्या एका चित्रावरून पाकिस्तानमध्ये गदारोळ निर्माण झाला आहे.

अयोध्येत पंतप्रधान मोदी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या; मात्र राममंदिराविषयी मौन !

५ वर्षांनंतर केवळ निवडणुकीच्या प्रसारासाठी अयोध्येत जाणारे मोदी राममंदिर बांधतील, याची अपेक्षा हिंदूंनी करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे, असेच म्हणायला हवे !

पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’, तसेच ‘नकाब’ बंदी करावी ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाब, तसेच चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्र्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी घोषित केले.

कर्नाटक सरकार कुक्के सुब्रह्मण्यम् मंदिरासाठी ८० कोटी रुपयांचा सोन्याचा रथ बनवणार

सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा ज्योतिषाच्या सल्ल्यावरून निर्णय : स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे मुख्यमंत्री अशा प्रकारे मंदिराला दानधर्म करतात; मात्र अन्य वेळी हिंदुविरोधी निर्णय घेऊन हिंदु धर्मावर आघात करतात. अशांवर देवाची कृपा कशी होईल ?

लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत ३ सहस्र कोटी रुपयांचा काळा पैसा जप्त

पुढच्या टप्प्यात १० सहस्र कोटी रुपये जप्त होण्याची, १ लाख कोटी रुपये काळा पैसा खर्च होण्याची शक्यता ! नोटाबंदीमुळे देशातील काळा पैसा एक पैशानेही न्यून झालेला नाही, हेच यातून उघड होते ! मतांद्वारे नव्हे, तर नोटांद्वारे होणारी निवडणूक लोकशाही निरर्थक ठरवते !

अमेरिकेत शीख कुटुंबातील ४ जणांची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेतील ओहियो प्रांतातील वेस्ट चेस्टर भागात २८ एप्रिलच्या रात्री एका शीख कुटुंबातील ४ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये ३ महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF