पाक ३० सहस्र मदरशांचे सरकारीकरण करणार ! – सैन्य प्रवक्ते

आता भाजप सरकारनेही देशातील मदरसे बंद करून तेथे शासकीय अभ्यासक्रम चालू केला पाहिजे ! पैशांसाठी मंदिरांचे सरकारीकरण करत सुटलेले भारत सरकार मदरशांना मात्र अनुदान देऊन आतंकवाद पोसतो !

इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बकर अल बगदादी जिवंत

श्रीलंकेतील स्फोटांचे दायित्व स्वीकारले ! जोपर्यंत जिहादी आतंकवादी संघटना आणि त्यांचे प्रमुख यांना नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होत नाही, हेच यातून लक्षात येते !

भारतीय उद्योगपती नेस वाडिया यांना अमली पदार्थ बाळगल्यावरून जपानमधील न्यायालयाकडून २ वर्षांची शिक्षा

जपानमध्ये केवळ दीड मासामध्येच खटला चालवून शिक्षा होऊ शकते, हे भारतियांसाठी आश्‍चर्यकारकच होय ! भारतात एखाद्या मोठ्या उद्योगपतीला शिक्षा होणे, हेच मुळात आश्‍चर्यकारक ठरू शकते ! 

त्र्यंबकेश्‍वर येथे पुरी पीठाधीश्‍वर श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साधना तथा राष्ट्ररक्षा शिबिर !

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) येथे पुरी पीठाधीश्‍वर श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २० वे साधना तथा राष्ट्ररक्षा शिबिर पार पडले.

ब्रिटीश नागरिकत्वाच्या सूत्रावरून राहुल गांधी यांना गृहमंत्रालयाची नोटीस

भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.

केरळमध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केरळच्या कासारगोड येथून चौकशीसाठी कह्यात घेतलेल्या इस्लामिक स्टेटच्या रियाज अबू बकर या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे.

हडपसर (पुणे) येथील नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !

धर्माभिमान्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा परिणाम ! धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून कळत-नकळत देवतांचा अनादर होतो आणि देवाप्रतीचा भावही बोथट होतो. हिंदूंनी दिलेल्या निवेदनाची नोंद घेत त्वरित कृती करणार्‍या रुग्णालय प्रशासनाचा आदर्श इतरांनीही घ्यावा !

हेमंत करकरे यांची एटीएस प्रमुखपदी असतांनाची भूमिका चुकीची होती ! – लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन

हेमंत करकरे कर्तव्यावर असतांना त्यांचा मृत्यू झाल्याने ते हुतात्मा आहेत; मात्र त्यांची आतंकवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख असतांनाची भूमिका चुकीची होती, असे विधान लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF