बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहीन ! – अधिवक्ता रवींद्र घोष, अध्यक्ष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’

भगवंताच्या आशीर्वादामुळेच आम्ही बांगलादेशामध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करू शकत आहोत. ‘बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी ‘संतांचे आशीर्वाद आणि सदिच्छा’, हाच उपाय आहे’, असे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी सांगितले.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ ‘नांदेड अधिवक्ता संघा’चे न्यायालयीन कामकाज बंद !

न्यायालयीन कामकाज बंद ठेवणारे नांदेड हे देशातील पहिले न्यायालय ! अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात कृती करणार्‍या ‘नांदेड अधिवक्ता संघा’चे अभिनंदन ! अशा प्रकारे सर्वत्रचे अधिवक्ता संघटित झाल्यास कोणीही हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना नाहक छळण्याचे धाडस करणार नाही !

श्रीरामाप्रती उत्कट भाव असणारे आणि राममंदिर उभारण्यासाठी तन, मन, धन अन् प्राणही समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन (वय ६५ वर्षे) संतपदी विराजमान !

निष्काम कर्मयोगी असलेले अधिवक्ता पू. हरि शंकर जैन (वय ६५ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ३० मे यादिवशी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये दिली.

नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

३० मे या दिवशी सायंकाळी नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍या कार्यकाळासाठी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनावर झालेल्या एका सोहळ्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये १६ आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे सक्रीय

जोपर्यंत भाजप सरकार सर्व आतंकवादी प्रशिक्षण केंद्रांना एकाच वेळी नष्ट करत नाही आणि पाकच्या सैन्याला कायमचा धडा शिकवत नाही, तोपर्यंत भारतात आतंकवादी कारवाया चालूच रहाणार आहेत !

प्रथम उद्योगपती अधिवेशनात उद्योगपतींनी व्यक्त केलेले मनोगत !

२८ मे या दिवशी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांतर्गत उद्योगपती परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम उद्योगपती अधिवेशनाच्या तिसर्‍या सत्रात उद्योगपतींनी व्यक्त केलेले मनोगत येथे देत आहोत.

(म्हणे) ‘बरे झाले मला पती नाही, नाहीतर सती जावे लागले असते ! – तसलिमा नसरिन यांचे पायल रोहतगी यांच्या ट्वीटला हिंदुद्वेषी प्रत्युत्तर

अभिनेत्री पायल रोहतगी यांनी या संदर्भात केलेल्या ट्वीटला प्रत्युत्तर देतांना तस्लिमा यांनी हे ट्वीट केले आहे.

राष्ट्रप्रेमी आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर अन् विक्रम भावे यांच्या अन्यायकारक अटकेच्या निषेधार्थ रत्नागिरी येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

या वेळी पुरोगाम्यांच्या तालावर नाचणार्‍या ‘सीबीआय’ची फिरली नीती हिंदुत्वनिष्ठांचे बळी जाणार किती ?’; ‘चौकशी करा चौकशी करा, कलंकित ‘सीबीआय’ अधिकार्‍यांची चौकशी करा !’; ‘नाही चालणार नाही चालणार, हिंदूंचे खच्चीकरण नाही चालणार !’ आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


Multi Language |Offline reading | PDF