आचारसंहितेच्या काळात मुंबईत ४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ, ३९१ अवैध शस्त्रे जप्त

महान अशा भारतीय लोकशाहीत जनतेला आमिषे दाखवणारे लोकप्रतिनिधीच निपजले. असे असूनही लोकशाहीचे गुणगान गाणार्‍यांना त्याचे काहीच वाटत नाही ! एकट्या मुंबईची ही स्थिती असेल, तर राज्याची आणि देशाची काय स्थिती असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !

पनवेल येथे मतदारांना पैसे वाटतांना २ जणांना शिवसैनिकांनी पकडले

मतांसाठी पैशांची लाच देणारे राजकीय पक्ष उद्या भ्रष्टाचार करून हे पैसे व्याजासह पुन्हा मतदारांच्या खिशातून वसूल करणार, हे लक्षात घ्या ! असे भ्रष्टाचारी पक्ष देणारी निरर्थक लोकशाही आता पुरे !

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांनी मसूद अझहर याला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईक करावाच लागला नसता !’ – काँग्रेस नेते दिग्विजय सिंह

जर साध्वी प्रज्ञासिंह किंवा अन्य कोणत्याही संतांना खरेच शाप द्यायचा असेल, तर तो भारतातील देशद्रोह्यांच्या नाशासाठी देतील आणि नंतर असे प्रश्‍न करणारे कोणी शिल्लकच रहाणार नाहीत !

(म्हणे) ‘कलम ३७० रहित करण्याच्या प्रयत्नात असणार्‍यांपासून काश्मीरला सर्वाधिक धोका !’ – ओमर अब्दुल्ला

वास्तविक कलम ३७० रहित करू न देणार्‍यांपासून देशाला धोका असल्यामुळे त्यांना कारागृहात डांबून कठोर शिक्षा केली पाहिजे ! काश्मीरमधील थोडीशी भूमी हिंदूंच्या तीर्थस्थळाला देण्यावरून कलम ३७० कमकुवत होत असेल, तर संपूर्ण काश्मीरच तीर्थस्थळांना देऊन टाकले पाहिजे, मग हे कलमच रहाणार नाही !

वयाच्या १६ वर्षांनंतर सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पोक्सो कायद्यातून सूट देण्यात यावी ! – मद्रास उच्च न्यायालयाचा सल्ला

अशामुळे समाजात अनाचार बोकाळणार नाही का ? न्यायालयच जर असा सल्ला देऊ लागले, तर समाजात नीतीमत्ता आणि सदाचार टिकवण्यासाठी सामान्य नागरिकांनी कोणाकडे आशेने पहायचे ?

(म्हणे) ‘न्यायाधीश सवर्ण असल्यामुळेच लालूप्रसाद यादव यांना शिक्षा झाली !’ – राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी

‘न्यायाधीशही जातीनुसार निर्णय देतात’, असे म्हणणे हा न्यायालयाचा अवमान आहे. अशांना थेट कारागृहातच डांबण्याचा आदेश न्यायालयाने दिला पाहिजे ! स्वतःच्या नेत्याच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी अशा प्रकारे कायदाद्रोही विधाने करणारे नेते जनहित काय साधणार ?

श्रीलंकेतील मशिदीतून ४७ तलवारी, २५ सुर्‍या आणि १५ मोठे चाकू जप्त

कुठे जिहादी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी मशिदीत घुसून शस्त्रसाठा जप्त करणारे श्रीलंकेतील पोलीस, तर कुठे मशिदींवरील अवैध भोंगेही काढण्यास टाळणारे भारतातील नेभळट पोलीस ! भारतात आतंकवाद नष्ट करण्यासाठी अशी कारवाई का केली जात नाही ?

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा

तोंगगुडा येथे दुचाकीवरून जाणार्‍या दोन पोलिसांचा नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात मृत्यू झाला. तसेच एक गावकरीही घायाळ झाला.


Multi Language |Offline reading | PDF