श्रीलंकेमध्ये इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी ठार

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या संदर्भात सुरक्षारक्षकांनी पूर्व भागातील इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर धाडी घालून १५ आतंकवाद्यांना ठार केले.

(म्हणे) ‘प्रज्ञा साध्वी, साक्षी महाराज, सोलापूरचे स्वामी यांना संसदेत पाठवून कुंभमेळा भरवायचा आहे का ?’ – सक्षणा सलगर, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना संसदेत पाठवून त्यांनी काय दिवे लावले ? उलट भ्रष्टाचार करणे, राष्ट्रविरोधकांचे समर्थन करणे असले उद्योग करून एक प्रकारे देशविघातक कारवायांना खतपाणीच घातले ! त्यामुळे ‘संसदेचा कुंभमेळा झाल्याचे परवडेल !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणात राजकीय पक्ष अन् नेते यांचा हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घ्या ! – मुंबई उच्च न्यायालय

पुरोगामी नेत्यांच्या हत्या झाल्याच्या क्षणापासून अन्वेषणाला प्रारंभ होण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांकडून ‘हिंदु आतंकवादा’ची ओरड करत सनातन संस्थेला लक्ष्य करण्यात आले. हा त्रास सनातनच्या साधकांनाही आतापर्यंत सातत्याने भोगावा लागत आहे.

ख्रिस्त्यांच्या देशनिष्ठेविषयी शंका उपस्थित करणार्‍या कर्नाटकातील भाजपच्या नेत्यावर ख्रिस्ती धर्मगुरूंची टीका

गरीब हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या सूत्रावर ख्रिस्ती धर्मगुरु ‘ब्र’ही काढत नाहीत ! ख्रिस्त्यांना ठराविक पक्षांनाच मतदान करण्याचे आवाहन करून कायदाद्रोह करणार्‍या धर्मगुरूंविषयी अन्य ख्रिस्ती धर्मगुरु मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या !

सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात धर्मांधाकडून मोठ्या प्रमाणात जिहाद करण्याच्या धमकीचे पत्र

हिंदूंनो, धर्मांधांकडून जिहाद करण्याच्या दिल्या जाणार्‍या धमक्या जाणा आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी वेळीच संघटित होऊन अन् धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

लैंगिक शोषणाचे अन्वेषण पूर्ण होईपर्यंत आरोपीची ओळख लपवावी !

यूथ बार असोसिएशन ऑफ इंडियाची याचिका : थेट सरन्यायाधिशांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यावर आता अधिवक्त्यांकडून अशा प्रकारची मागणी केली जात आहे का ? यापूर्वी त्यांनी हिंदूंचे संत आणि अन्य व्यक्ती यांच्या प्रकरणानंतर अशी मागणी केली नव्हती, हे लक्षात घ्या !

जगातील सध्याच्या सर्वाधिक १५ उष्ण शहरांमधील सर्व शहरे भारतातील !

‘एल् डोरॅडो’ या वातावरणाच्या संदर्भात माहिती देणार्‍या संकेतस्थळाने जगातील उष्ण शहरांची सूची प्रसिद्ध केली आहे. यात १५ शहरांची नावे दिली असून ही सर्व १५ शहरे भारतातील आहेत.

हिंदूंचे धार्मिक प्रतीक असलेले ‘स्वस्तिक’ सकारात्मक, तर नाझींचे ‘स्वस्तिक’ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करते ! – संशोधनातून निष्कर्ष

मूळ ‘हिंदु स्वस्तिक’ आणि ‘नाझी स्वस्तिक’ यांतील भेद स्पष्ट करणारे पुष्कळ लिखाण विविध संकेतस्थळांवर उपलब्ध आहे; परंतु आज आपण भौतिक आणि ऐतिहासिक भेदांच्या पलीकडे जाऊन या दोन्ही स्वस्तिकांतील सूक्ष्म स्तरावरील भेदांचा अभ्यास करायला हवा.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदूसंघटनाचे व्यापक कार्य समजून न घेता तिच्यावर द्वेषमूलक टीका करून हिंदुत्वाची हानी करणारे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते !

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच काही शहरांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यटन खात्यात कचरा पेटी खरेदी घोटाळा ! – होप फाऊंडेशनचा आरोप

पर्यटन खात्यात मोठ्या प्रमाणात कचरा पेटी खरेदी घोटाळा झालेला आहे. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आरोप गोवास्थित होप फाऊंडेशन या अशासकीय संस्थेने येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.


Multi Language |Offline reading | PDF