(म्हणे) ‘धर्मयुद्धावरून साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुसलमानांची क्षमा मागावी !’

‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा १०० कोटी हिंदूंना संपवू’, असे विधान करणारे अकबरूद्दीन ओेवैसी यांनी हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणी फातिमा यांनी कधी केली होती का ?

कॅनडाने पाठवलेला कचरा माघारी न नेल्यास युद्ध करू ! – फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांची चेतावणी

कुठे कचरा माघारी न नेल्यास युद्धाची घोषणा करणारा छोटासा फिलिपिन्स, तर कुठे गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकला एकदाही अशी चेतावणी न देणारा आणि प्रत्यक्षातही निष्क्रीय रहाणारा भारत !

‘विक्रमादित्य’वरील आगीत नौदल अधिकार्‍याचा मृत्यू

भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य कारवार बंदरात प्रवेश करत असतांना तिला आग लागली. ही आग विझवतांना लेफ्टनंट कमांडर डी.एस्. चौहान या नौदल अधिकार्‍याचा मृत्यू झाला.

अफगाणिस्तान आणि सीरिया येथील भारतीय वंशाच्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांवर भारताचे लक्ष

भारतात घातपात करण्याची शक्यता : आतंकवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यात वेळ का वाया घालवायचा ? त्याऐवजी ते असतील, तेथे घुसून त्यांचा निःपात का केला जात नाही ? हिंदूंना आतंकवादी म्हणणारे ‘इस्लामिक स्टेटचे आतंकवादी कोणत्या धर्माचे आहेत’, हे का सांगत नाहीत ?

झारखंडमध्ये माओवाद्यांनी भाजपचे कार्यालय उडवले

भाजप सरकारने ५ वर्षांत नक्षलवादाचा समूळ नाश केला असता, तर ही घटना घडली नसती ! स्वतःच्या पक्षाचे कार्यालय उडवल्यावर तरी भाजप सरकार नक्षलवाद्यांना अद्दल घडवणार का ?

चीनने संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशात दाखवले !

चीनला आशियामध्ये तो राबवत असलेल्या ‘बीआर्आय’ प्रकल्पासाठी भारताचे सहकार्य हवे आहे. त्यामुळेच भारताला खुश करण्यासाठी त्याने हे जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल आहे. चीनच्या अशा खेळीकडे भारतानेही तितक्याच सतर्कतेने पाहिले पाहिजे !

प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी २ मासांचा कालावधी मागणार्‍या पोलिसांना न्यायालयाने खडसावले !

मंदिरांना अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करणारे पोलीस मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यास का कचरतात ? यावरून या देशात कोण सहिष्णु आणि कोण असहिष्णु आहे, हे दिसून येते !

राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उपेंद्र कुशवाह यांच्याकडून भाजपवर टीका करतांना माता सीतेवर आक्षेपार्ह विधान

भाजपवर टीका करण्यासाठी उपेंद्र कुशवाह यांना अन्य उदाहरणे देता आली असती; मात्र त्यांनी माता सीतेची भूमिका करणार्‍या व्यक्तीवर टिप्पणी करून माता सीतेचा अवमान केला आहे. यासाठी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा सुरेख संगम असलेले बेळगाव येथील डॉ. नीलकंठ दीक्षित (वय ९० वर्षे) सनातनच्या ८७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

येथे २५.४.२०१९ या दिवशी झालेल्या सत्संगसोहळ्यात डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित हे सनातनचे ८७ वे संत झाल्याचे आणि त्यांच्या पत्नी सौ. विजया नीलकंठ दीक्षित यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF