गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यास आमच्याकडून हलगर्जीपणा ! – श्रीलंकेच्या पंतप्रधानांची स्वीकृती

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने असा हलगर्जीपणा केल्यावर काय होते, हे भारतानेही अनुभवले आहे ! भारतीय गुप्तचर यंत्रणा भारतीय शासनकर्त्यांना आणि श्रीलंकेलाही महत्त्वाची गोपनीय माहिती देते; मात्र जसे भारतात त्याचा काहीच परिणाम होत नाही, तसाच श्रीलंकेतही झाला नाही, हेच लक्षात येते !

आसामच्या माजी पोलीस महासंचालकांनी मतदान केल्यावर दुसर्‍याला मत दिल्याची पावती निघाली !

तक्रार खोटी निघाली, तर तक्रारदारावर कारवाई होते; म्हणून तक्रार केली नाही ! एका वरिष्ठ माजी पोलीस अधिकार्‍याला या प्रकरणात तक्रार करायला भीती वाटते, यावरून भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेची विदारक स्थिती आपल्या लक्षात येते !

(म्हणे) ‘यासिन मलिक आजारी असल्याने त्यालाही साध्वी प्रज्ञासिंह यांच्याप्रमाणे तात्काळ सोडा !’ – मेहबूबा मुफ्ती यांची देशविरोधी मागणी

भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशी देशविरोधी विधाने खपवून घेतली जातात. असे असतांनाही ती रोखण्यासाठी भाजप सरकार धोरणात्मक कारवाई करत नाही, हे संतापजनक !

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवाकडून स्वामी चिदानंद पुरी यांचा अवमान

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन् यांनी येथील अद्वैत आश्रमाचे गुरु स्वामी चिदानंद पुरी यांचा अवमान केला. हिंदुद्वेषी माकपकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? पाद्री, इमाम, मौलवी यांचा अवमान करण्याचे धाडस कधी माकप दाखवतो का ?

पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील समाजवाद्यांचे उघड केलेले खरे स्वरूप !

पुरो(अधो)गामी समाजवादी कसे ढोंगी आहेत, हे यातून लक्षात येते ! अनेक वर्षांपूर्वीचा प्रसंग असला, तरी त्यांचा ढोंगीपणा तसाच आहे,याचा अनुभव नेहमीच येत असतो !

गोगोई यांना अडकवण्यासाठी मोठ्या उद्योजक घराण्याचा हात असल्याचा संशय  ! – गोगोई यांच्या अधिवक्त्यांचा दावा

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका विशेष खंडपिठाची स्थापना केली आहे.

एन्आयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रहित करण्याची मागणी फेटाळली

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रहित करण्याच्या मागणीसाठी केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

स्पेन जगातील सर्वांत आरोग्यसंपन्न देश, तर भारत १२० व्या स्थानी !

स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांत भारतीय नागरिकांच्या आरोग्याकडे सर्वपक्षीय शासनकर्त्यांकडून झालेले दुर्लक्ष लोकशाही निरर्थक ठरवते ! महासत्तेचे स्वप्न पहाणार्‍या सरकारचे नागरिकांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष !

सात्त्विक, सहनशील वृत्ती आणि निरपेक्ष प्रीती आदी दैवी गुण असणार्‍या श्रीमती शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) संतपदी विराजमान !

कर्नाटकातील एक निसर्गरम्य शहर म्हणजे कारवार ! कारवारमध्ये वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘गुरुकृपायोगानुसार साधने’विषयी मार्गदर्शन करणार्‍या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रेमभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अनन्य भाव या गुणांमुळे ‘सनातनच्या ८६ व्या व्यष्टी संतपदा’वर विराजमान झालेल्या पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) !

श्रीमती शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) मागील २७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. सध्या त्या त्यांची कन्या सौ. मेधा विलास जोशी यांच्यासह नंदनगद्दा, कारवार, कर्नाटक येथे रहातात.


Multi Language |Offline reading | PDF