कोटी कोटी प्रणाम !

• सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावे यांचा आज वाढदिवस
• सनातनच्या ४४ व्या संत पू. श्रीमती राधा प्रभु यांचा आज वाढदिवस

साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले ! – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

हे ११ वर्षांनंतर अमित शहा का बोलत आहेत ? इतकी वर्षे ते का बोलले नाहीत ? जेव्हा साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना अटक करण्यात आली, तेव्हा भाजप त्यांच्या पाठीशी ठामपणे का उभा राहिला नाही ?

(म्हणे) ‘भारताने ‘दिवाळी’साठी अणूबॉम्ब ठेवले नाहीत, तसे पाकनेही ते‘ईद’साठी ठेवलेले नाहीत!’

मेहबूबा मुफ्ती यांची देशद्रोही विधाने चालूच : पाकच्या प्रवक्त्यांप्रमाणे बोलणार्‍या मेहबूबा मुफ्ती ! पाकचा निःपात करण्याआधी त्याची तळी उचलणार्‍या अशा नेत्यांना सरकारने प्रथम वठणीवर आणावे !

श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी २२ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू होणार असल्याचे घोषित केले आहे. श्रीलंका सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने सामाजिक माध्यमांवर बंदी घातली आहे.

‘नॅशनल तौहीद जमात’कडूनच श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट

जिहादी आतंकवाद्यांनी आता श्रीलंकेलाही आणि त्यातही ख्रिस्त्यांना लक्ष्य केले आहे. यापूर्वी लिट्टेला आतंकवादी ठरवून तिचा निःपात करतांना ३५ सहस्र निरपराध हिंदूंचे हत्याकांड करणारी श्रीलंका जिहाद्यांच्या विरोधात काय करणार आहे, हे पहावे लागेल !

केरळमध्ये प्रचाराच्या वेळी एल्डीएफ् आणि युडीएफ् पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

पक्षाच्या नावात ‘लोकशाही’ शब्द असणार्‍या; मात्र लोकशाहीविरोधी कृत्य करणार्‍या अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे ! असे पक्ष आलटून पालटून सत्तेवर येत असतात, यावरून तेथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते !

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवून आणणारी जिहादी संघटना ‘नॅशनल तौहीद जमात’ तमिळनाडूतही सक्रीय

भारताने या संघटनेवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, तसेच भारतात पुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत; म्हणून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जिहादी संघटनांवरही आताच बंदी घातली पाहिजे !

हेमंत करकरे यांचा अपमान केला नाही ! – साध्वी प्रज्ञासिंह यांचे निवडणूक आयोगाच्या नोटिसीला उत्तर

मी तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मला देण्यात आलेल्या यातनांचा उल्लेख केला होता. माझ्यासमवेत त्या वेळी जे झाले ते जनतेसमोर ठेवणे हा माझा अधिकार आहे. माझ्या वक्तव्याला माध्यमांनी मोडून-तोडून सादर केले आहे. जनभावनेचा सन्मान करतांना मी माझे विधान मागे घेतले होते.

निवडणूक आयोगाची हास्यास्पद कार्यक्षमता ! जगात एकाही देशात असे होत नाही !

‘देशातील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ७ टप्प्यांत चालू आहे. मतदानाचा पहिला टप्पा ११ एप्रिल या दिवशी झाला, तर शेवटचा १९ मे या दिवशी


Multi Language |Offline reading | PDF