श्रीलंकेत ८ बॉम्बस्फोटांमध्ये २०७ जण ठार, तर ४०० हून अधिक घायाळ

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे सकाळी साडेआठच्या सुमारास एकापाठोपाठ झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २०७ जणांचा मृत्यू झाला, तर ४०० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये एका भारतियाचा समावेश आहे.

साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही ! – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद हे कटकारस्थाने करण्यासाठी एकत्र जमत होते, हे खोटे आहे आणि दोन न्यायालयांनी हे स्पष्ट केले आहे.

गंगानदीच्या स्वच्छतेसाठी संत आत्मबोधानंद (वय २६ वर्षे) यांचे १८० दिवसांपासून उपोषण

यापूर्वी ८६ वर्षीय स्वामी सानंद यांनी गंगानदीच्या स्वच्छतेसाठी १११ दिवस उपोषण करूनही भाजप सरकारने त्यांची कोणतीही नोंद न घेतल्याने त्यांनी प्राणत्याग केला होता. त्यामुळे असे सरकार संत आत्मबोधानंद यांच्या उपोषणाची नोंद घेत नाहीत, यात आश्‍चर्य ते काय ?

छत्तीसगडमध्ये २ नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांना एकेक करून ठार करण्यापेक्षा त्यांच्यावर थेट सैनिकी कारवाई करून आणि एअरस्ट्राईक करून त्यांचा सोक्षमोक्षच लावायला हवा !

तेलंगणमधील मंदिरांच्या ८५ सहस्र एकर भूमीपैकी २४ सहस्र एकर भूमीवर भू माफियांचे अतिक्रमण

तेलंगण राज्यातील मंदिरांच्या सुमारे २४ सहस्र एकर भूमीवर भू माफियांनी अतिक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार सातत्याने हिंदुविरोधी निर्णय घेत असते. त्याच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

मी बाबरी तोडली आणि आता राममंदिरही उभारणार ! – साध्वी प्रज्ञासिंह

बाबरी मशीद पाडल्यापासून आतापर्यंत किती भाजपवाल्यांनी अशा प्रकारे दायित्व घेण्याचे धाडस दाखवून मंदिर बांधण्याचे सांगितले आहे ? बाबरी मशीद पाडल्यावर भाजपने हात झटकून कारसेवकांना वार्‍यावर सोडून दिले होते, हे हिंदू विसरलेले नाहीत !

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या शापाने कोणाला मरतांना पाहिलेले नाही ! – माजी सरकारी अधिवक्त्या रोहिणी सालियन

साध्वी प्रज्ञासिंह यांनी असे विधान निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेले नाही, तर यापूर्वीही अनेकदा जाहीरपणे आणि प्रसारमाध्यमांच्या मुलाखतींमध्ये त्यांनी असेच सांगितले आहे. ‘आंधळ्याला दिसत नाही; म्हणून सृष्टी नाही’, असे कधी म्हणता येईल का ?

संयमी आणि मितभाषी असलेले दादर येथील श्री. सतीश बांगर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

संयमीवृत्ती, मितभाषी आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असलेले दादर सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सतीश बांगर (वय ५१ वर्षे) हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now