सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर महिला कर्मचार्‍याकडून लैंगिक छळाचा आरोप

देशाच्या सरन्यायाधिशांवरच असा आरोप झाल्यावर ‘मी टू’ या महिलांवर लैंगिक शोषणाच्या आंदोलनावरून आवाज उठवणार्‍या सर्व महिला अद्याप गप्प का ? महिला मानवाधिकार आयोग यावर का बोलत नाही ? हिंदूंच्या संतांवर आरोप झाल्यावर त्यांची वाट्टेल तशी अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे आता गप्प का ?

आतंकवादाला समूळ नष्ट करण्यासाठी त्याच्याशी सैन्यशक्तीच्या जोडीलाच धर्मशक्तीच्या स्तरावरही लढायला हवे !

. . . भारतालाही केवळ सैन्यशक्तीच्या स्तरावरच नव्हे, तर धर्मशक्तीच्या स्तरावरही लढावे लागेल. भारताला ‘निधर्मी’ बनवणार्‍या राज्यकर्त्यांना हे कसे समजणार ? यासाठीच हिंदूंनो, ‘धर्माधिष्ठित अशा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही’, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी संघटित व्हा ! – पू. संदीप आळशी

सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेही जामिनावर आहेत ! – नरेंद्र मोदी

जगात गेल्या ५ सहस्र वर्षांपासून ज्या महान संस्कृती आणि परंपरा यांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा संदेश दिला . . . त्या संस्कृतीला तुम्ही (काँग्रेस नेते) आतंकवाद ठरवून मोकळे झालात. या सर्वांना उत्तर देण्यासाठी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देणे हे एक प्रतीक आहे. काँग्रेसला हे आरोप महागात पडणार आहेत. – नरेंद्र मोदी

माझा छळ केल्याप्रकरणी क्षमा मागणार का ? – साध्वी प्रज्ञासिंह यांचा प्रश्‍न

हेमंत करकरे यांच्या कथित अवमानावरून साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टीका करणारे; मात्र साध्वींवर झालेल्या अत्याचाराविषयी मौन बाळगून आहेत, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. न्यायालयाने साध्वी यांना दोषी ठरवले नसतांना त्यांना आतंकवादी म्हणणारे कायदाद्रोहीच होत !

हरिद्वार आणि धारवाड येथे ‘सनातन प्रभात’च्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप’मधील अनुक्रमे हिंदी पाक्षिक आणि कन्नड साप्ताहिक यांचे प्रकाशन

सनातन प्रभात गेल्या २० वर्षांपासून अखंड धर्मसेवा करत आहे. संतांच्या वचनानुसार चालणार्‍या सनातन प्रभातला सर्व संतांचे आशीर्वाद आहेत. राष्ट्र आणि धर्म यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी सनातन प्रभात दिशा देत आहे. – महामंडलेश्‍वर श्री कैलाशानंद ब्रह्मचारी महाराज

हिंदु युवकाचा छळ करणार्‍या पोलिसांचे निलंबन न केल्यास आंदोलन !

पोलिसांच्या या हिंदुद्वेषी आणि अमानवीय प्रकाराच्या विरोधात शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या असून या प्रकरणी संबंधित दोषी अधिकार्‍यांचे तातडीने निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टीकाकारांनो, धर्मनिष्ठ ‘सनातन प्रभात’मधून भाजपच्या निर्णयांवर केल्या जाणार्‍या परखड लिखाणामागील हेतू समजून घ्या !

सनातन प्रभातमध्ये हिंदुद्वेषी, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांच्यावर परखडपणे लिखाण केले जाते. एवढेच नाही, तर हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे पक्ष आणि संघटना यांनाही त्यांच्या चुका दाखवून दिल्या जातात. बरेच हिंदुत्वनिष्ठ, तसेच भाजपचे समर्थक यांना हे खटकत असल्यामुळे ते सनातन प्रभातवर टीका करतात.

एका नावाजलेल्या रुग्णालयात शस्त्रकर्म करण्यापूर्वी रुग्णाला तपासण्यांच्या संदर्भात आलेले कटू अनुभव !

माझ्या यजमानांच्या पायाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकल्याने रक्तप्रवाहात अडथळा येऊन त्यांचा उजवा पाय सतत दुखायचा. त्यांना होणार्‍या वेदनांची तीव्रता एवढी अधिक होती की, पाय नुसता टेकला, तरी खिळे टोचल्यासारखे दुखायचे. त्यामुळे मार्च २०१८ मध्ये त्यांची ‘सी.टी. स्कॅन’ ही तपासणी करण्यात आली.

कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी ठाणे येथील हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अतुल देव यांची पोलीस हवालदार भांबरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासह ७ पोलिसांकडून चौकशी

कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी १६ एप्रिल २०१९ या दिवशी येथील पोलीस ठाण्याचे हवालदार भांबरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासह एकूण ७ पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अतुल देव यांची चौकशी केली. १५ एप्रिल या दिवशी पोलिसांनी श्री. देव यांना सकाळी ११ वाजता भेटण्यास सांगितले होते; परंतु पोलिसांनी ‘नंतर भेटू’, असे कळवले.


Multi Language |Offline reading | PDF