हेमंत करकरे यांना मी ‘तुमचा सर्वनाश होईल’, असा शाप दिला होता ! – साध्वी प्रज्ञासिंह

खरे साधू, संत आणि संन्यासी हे विनाकारण कोणालाही शाप देत नाहीत. ते कर्मफलन्यायानुसार प्रत्येक घटनेकडे पहातात; मात्र त्यांच्यावर कोणी अत्याचार केला आणि जर त्यांनी शाप दिला, तर त्या शापाचा परिणाम त्यांची साधना असल्याने होत असतो, असे अध्यात्मशास्त्र सांगते.

भाषण करतांना काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीने कानशिलात लगावली !

‘कोणी एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे केल्यास समोरच्या व्यक्तीचे मनपरिवर्तन होते’, असे मोहनदास गांधी यांनी म्हटले होते; अहिंसावादी काँग्रेसचे कार्यकर्ते ही शिकवण विसरले आणि त्यांनी मारणार्‍या व्यक्तीला अमानुष मारहाण केली, यातून काँग्रेस किती ढोंगी आणि हिंसाचारी आहे, हे स्पष्ट होते !

(म्हणे) ‘भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पाहिल्यास डोळे फोडू, बोटे तोडू !’ – केंद्रीयमंत्री मनोज सिन्हा यांची धमकी

भारतीय सैनिकांकडे, नागरिकांकडे, महिलांकडे, हिंदूंकडे, हिंदु तरुणींकडे वाईट दृष्टीने पहाणार्‍यांवर कठोर कारवाई करू न शकणारे भाजपचे मंत्री स्वपक्षाच्या कार्यकर्त्याकडे कोणी अशा दृष्टीने पाहिल्यास धमकी देतात. यावरून त्यांची संकुचितता लक्षात येते !

हरिद्वारसहित २४ रेल्वेस्थानकांवर आक्रमण करण्याची लष्कर-ए-तोयबाची धमकी

लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांच्याकडून घातपात करण्यापूर्वीच पाकमध्ये घुसून त्यांच्या आतंकवाद्यांना, प्रशिक्षण केंद्रांना भारताने नष्ट केले पाहिजे ! भारतियांनी अशा धमक्यांच्या छायेखाली आणखी किती वर्षे जगायचे आहे ?

भाजप हिंदुत्वनिष्ठ पक्ष नाही ! – मालेगाव स्फोटाच्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी

योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनवणे ही भाजपची आवश्यकता होती. भाजप स्वतःची पोळी भाजून घेत आहे. भाजप देश नाही, तर केवळ पक्ष चालवत आहे. त्याने पक्ष हा व्यापार बनवला आहे. भाजपने देशाला सोडून दिले आहे. देशाला देव चालवत आहे. – सुधाकर चतुर्वेदी

येणार्‍या भीषण आपत्काळात रक्षण होण्यासाठी सर्वांनी साधना करून तपोबल वाढवण्याची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळच्या दौर्‍यात ८.४.२०१९ या दिवशी काठमांडू येथील दैनिक ‘नया पत्रिका’चे पत्रकार श्री. परशुराम काफले, विराटनगर जूट मिलचे अध्यक्ष आणि नेपाळ सरकारच्या …..

बाबूश मोन्सेरात यांची ‘गोवा फॉरवर्ड’ला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये प्रवेश

पक्षविरोधी कारवाया करत असल्याच्या कारणावरून ४ वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षातून निलंबित केलेले बाबूश मोन्सेरात यांनी १८ एप्रिल या दिवशी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक …..

दुसर्‍याला चोर म्हणणार्‍यांचा एक पाय कारागृहात आहे, हे त्यांनी विसरू नये ! – उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख

६० वर्षे भ्रष्टाचार करून ज्यांची पोटे भरली नाहीत त्यांनी या देशावर केवळ दरोडे टाकण्याचेच काम केले आहे. त्यांनी अनेक घोटाळे केले. स्वतः दरोडेखोर असतांना दुसर्‍याला चोर म्हणणार्‍यांचा एक पाय कारागृहात आहे, हे त्यांनी विसरू नये…..

प्रकाशझोतातील मासेमारीच्या विरोधात येत्या निवडणुकीनंतर तीव्र लढा उभारणार ! – नारायण राणे, खासदार

प्रकाश झोतातील (एल्ईडीच्या) मासेमारीमुळे मासेमार बांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे. एल्ईडीधारकांशी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे या मासेमारीच्या विरोधात येत्या निवडणुकीनंतर….

मुलांकडून धर्माचरण करवून घेणारी वाशी, नवी मुंबई येथील ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’ची शाळा !

‘मी वाशी, नवी मुंबई येथील ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत शिकत आहे. मी इयत्ता ४ थीत असतांना माझ्या वर्गशिक्षिका मुलांकडून प्रतिदिन २ आरत्या (गणपति आणि शिव यांच्या) म्हणवून घ्यायच्या.


Multi Language |Offline reading | PDF