केरळमध्ये माकपच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून नामजप चालू असल्याने नेत्यांकडून मंदिराचा वीजपुरवठा खंडित

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी आणि माकपच्या नेत्यांनी भाषणाच्या वेळी अजान चालू झाल्यावर मशिदीचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडस कधी केले असते का ?

(म्हणे) ‘तुम्हाला (कार्यकर्त्यांना) रोखण्याचा प्रयत्न केला, तर सैनिकांना झाडूने झोडून काढा !’

तृणमूल काँग्रेसच्या महिला आमदार रत्ना घोष यांचे देशविरोधी विधान : ‘पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांचा अवमान केला आहे’, अशी टीका करणारेच आता थेट सैनिकांना मारहाण करण्याची भाषा करत आहेत, हे लक्षात घ्या !

भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी एकत्र आले पाहिजे ! – ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’चे आवाहन

चर्च संघटनांनी कधी काँग्रेस आणि अन्य हिंदुद्वेषी पक्ष यांच्या विरोधात असे आवाहन केलेेले नाही, याचाच अर्थ ते धर्माच्या नावानेच भाजप आघाडी सरकारला विरोध करत आहेत, हे स्पष्ट होते !

निवडणूक आयोगाकडून ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या सामानाची पडताळणी

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवरून उड्डाण घेण्याच्या काही वेळ आधीच थांबवून त्यांच्या बॅगा तपासल्या. तसेच हेलिकॉप्टरचीही पडताळणी केली.

तमिळनाडूमध्ये एएमएमएमकेच्या पक्ष कार्यालयावरील धाडीतून मतदारांना वाटण्यासाठीचे १ कोटी ४८ लाख रुपये जप्त

कारवाईच्या वेळी कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने पोलिसांचा हवेत गोळीबार : मतांवर नाही, तर नोटांवर चालणारी लोकशाही ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) अपरिहार्य करते !

पठाणकोट (पंजाब) येथे पाकिस्तानी नागरिकाची भारतीय सीमेत घुसखोरी करून भारतियाला मारहाण

पाकच्या या कुरापतींच्या विरोधात भाजप सरकार काय कृती करणार आहे ? काँग्रेसच्या राज्यात पाकचे सैनिक भारतात घुसून भारतीय सैनिकांना ठार करून त्यांचे शिर कापून घेऊन गेले होते, तशी घटना नागरिकांच्या संदर्भात घडण्याची सरकार वाट पहाणार आहे का ?

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भाजपकडून दिग्विजय सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवणार !

आता साध्वी प्रज्ञासिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या भोपाळमधून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात निवडणुकीसाठी उभ्या रहाणार आहेत.

द्वेषमूलक भाषण करणारे फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी अखेर मागितली बिनशर्त क्षमा

राय येथील चर्चचे फादर कॉसेसांव डिसिल्वा यांनी भाजपच्या विरोधात केलेल्या द्वेषमूलक भाषणाची निवडणूक आयोगाकडे स्वीकृती देत याविषयी बिनशर्त क्षमा मागितली आहे.

मळा, पणजी येथील मारुती देवस्थानात मूर्तीची तोडफोड

मळा, पणजी येथील मारुतीराय देवस्थानच्या बाहेर असलेल्या मूर्तीची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांनी अतीन खाडका या नेपाळी नागरिकाला कह्यात घेतले आहे.

हिंदूंना जागृत करणे म्हणजे साधनेद्वारे त्यांच्यातील ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणे होय ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ५.४.२०१९ या दिवशी येथील श्री मोक्षधाम आश्रमाचे अध्यक्ष श्री. रोमानी प्रसाद पाठक आणि आश्रमाचे काही सदस्य यांची भेट घेतली.


Multi Language |Offline reading | PDF