जर कोणी तुम्हाला घरात प्रवेश देऊ इच्छित नसेल, तर तुम्ही पोलिसांना बोलावणार का ? – सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांनाच प्रश्‍न

हिंदूंचे मंदिर ‘सार्वजनिक’ आणि अन्य धर्मियांचे प्रार्थनास्थळ ‘वैयक्तिक’, असा अर्थ सर्वोच्च न्यायालयाला काढायचा आहे का ? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला, तर त्यात नवल ते काय ?

केवळ विजय मल्ल्या यांनीच नव्हे, तर ३६ उद्योगपतींनी पलायन केले ! – अंमलबजावणी संचालनालयाची न्यायालयात निलाजरी स्वीकृती

परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याच्या घोषणा करणार्‍या भाजपच्या राज्यात घोटाळे करणारे देशातून पळून जातात, हे भाजपला लज्जास्पद !

वाईट दृष्टीपासून वाचवण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना काँग्रेसवाल्यांनी लिंबू-मिरचीची माळ घातली

महाराष्ट्रात काँग्रेसनेच अंधश्रद्धा दूर करण्याच्या नावाखाली अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला; मात्र तीच काँग्रेस राजस्थानमध्ये अशा प्रकारच्या कृती करते, तेव्हा पुरो(अधो)गामी आंधळे होतात !

(म्हणे) ‘मुसलमानांनी संघटित होऊन मतदान केल्यास मोदी यांचा पराभव होईल !’ – काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांचे धर्माच्या आधारे आवाहन

प्रत्येक तथाकथित निधर्मी राजकीय पक्ष मुसलमानांना मतांसाठी आवाहन करत आहे. हा राज्यघटनेचा अवमान आहे, हे लक्षात घ्या ! इतर वेळी निधर्मीवादाची टिमकी वाजवणारी काँग्रेस किती धर्मांध आहे, हे यावरून स्पष्ट होते.

भगवान हनुमानाचे आक्षेपार्ह चित्र फेसबूकवर पोस्ट करणार्‍या दोघांना अटक

येथे भगवान हनुमानाचे आक्षेपार्ह चित्र फेसबूकवर पोस्ट केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. राज्यातील झुंडपुरा गावामधून या दोघांना अटक करण्यात आली.

लोकसेवा आयोगाच्या मनोचिकित्सा साहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या प्रश्‍नपत्रिकेत शबरीमला मंदिराच्या धार्मिक परंपरेचा अवमान करणारा प्रश्‍न

लोकसेवा आयोगाचा हिंदुद्वेष ! केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारा लोकसेवा आयोग अशा प्रकारचा प्रश्‍न कसा काय विचारू शकतो ? केंद्रातील भाजप सरकारच्या हे लक्षात येत नाही का ?

जैश-ए-महंमदकडून नियंत्रणरेषेवर पुन्हा आतंकवाद्यांसाठीचे ‘लॉन्चिंग पॅड’ सक्रीय

एखाद्या एअर किंवा सर्जिकल स्ट्राईकमुळे आतंकवाद नष्ट होत नाही, हेच ही घटना दर्शवते ! यासाठीच आतंकवादाचा पूर्ण निःपात करण्यासाठी आरपारची कारवाई केली पाहिजे !

पाकच्या सिंध प्रांतामध्ये वर्ष २०१८ मध्ये १ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे बलपूर्वक धर्मांतर अन् विवाह

पाकचे पंतप्रधान इम्रान खान भारतातील अल्पसंख्यांकांविषयी तोंड उघडतात. असा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी पाकला जाब विचारण्यासाठी का केला नाही ?

चर्च संस्थेचा माफीनामा; मात्र कारवाई करण्याविषयी कोणतीच वाच्यता नाही !

फादर डिसिल्वा यांच्या विधानामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास आम्ही क्षमा मागतो, असे डायोसेसन सेंटर फॉर कॉम्युनिकेशन्स मिडियाचे (सीबीसीआय) फादर ओलावो यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF