केवळ राममंदिरच नाही, तर काशी आणि मथुरा मुक्त करणे, हे आमचे ध्येय ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह

आम्ही केवळ अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाविषयी चर्चा करत नाही, तर काशी आणि मथुरा मुक्त करणे, हेही आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ, तसेच श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. टी. राजासिंह यांनी येथे केले.

जोधपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकीवरून परतणार्‍या हिंंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक !

काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणार, यात नवल काहीच नाही ! भाजपच्या राज्यांतही याहून वेगळी स्थिती नाही ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !

मंदिरात तुला करतांना पडल्यामुळे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना ११ टाके पडले

काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांची थिरूवनंतपूरममधील थंपानूर येथील ‘गंधारी अमन कोवित’ या मंदिरात तुला करतांना ते पडल्यामुळे दुखापत झाली. ‘हिंदूंवर टीका करणार्‍यांना शिक्षा मिळाली’, असे हिंदूंना वाटल्यास नवल ते काय ?

स्वदेशी बनावटीचे क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’चे यशस्वी परीक्षण

भारतीय शास्त्रज्ञ देशासाठी नवनवीन अस्त्र आणि शस्त्र यांची निर्मिती करत आहेत; मात्र त्यांचा वापर करण्याचा आदेश देणारे शासनकर्ते देशाला मिळाले नसल्याने त्यांचे महत्त्व न्यून होते !

झारखंडमध्ये ३ नक्षलवादी ठार, तर १ पोलीस हुतात्मा

नक्षलवाद्यांना एकेक करून ठार करण्यापेक्षा एकाच वेळी नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडून त्यांचा निःपात का केेला जात नाही ? यासाठी वायूदलाचे साहाय्य का घेतले जात नाही ?

प्रथम चित्रपट पहा, त्यावर निर्णय घ्या आणि त्याचा अभिप्राय कळवा ! – सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम् नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर बंदी आणावी कि नाही, हे चित्रपट पाहून ठरवा आणि त्याचा अभिप्राय २२ एप्रिलपर्यंत बंद लिफाफ्यात सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्याकडून अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर अश्‍लील शब्दांत टीका

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार अभिनेत्री जयाप्रदा उभ्या आहेत. खान यांनी जयाप्रदा यांच्यावर अश्‍लील भाषेत टीका केली आहे. राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरणच आझम खान यांनी दिले आहे !

श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करा !

दरवाढ रहित करून हिंदूंना विनामूल्य आरती करण्यास द्यावी, तसेच असा निर्णय घेऊन भक्तांची लुट करणारे ‘श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड’ विसर्जित करून प्रशासक नेमावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे.

रामनवमीची शोभायात्रा शिस्तबद्ध होण्यासाठी अमरावती येथे श्रीराम सेनेकडून हिंदु जनजागृती समितीला निमंत्रण

अमरावती शहरात श्रीराम सेनेच्या वतीने रामनवमीच्या दिवशी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीप्रमाणे शिस्तीत शोभायात्रा निघावी याकरिता त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना आयोजनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.

राममंदिर उभारणी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे विविध उपक्रम पार पडले

राममंदिर उभारणीच्या कार्यात श्रीरामाचा आशीर्वाद मिळण्यासाठी तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF