दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन प्रभातने आजपर्यंत कठोरपणे आणि यशस्वीपणे लढा दिला आहे. खरे तर समुहाला प्रेरित करणे हे फार कठीण काम असते, तरीही सनातन प्रभातने हे काम यशस्वीपणे पार पाडलेले आहे. हे कार्य म्हणजे एक दैवी चमत्कार आहे, असे प्रतिपादन भारत स्वाभिमानचे श्री. कमलेश बांदेकर यांनी केले.

(म्हणे) ‘आदिवासी, मागासवर्गीय आणि मुसलमान यांच्यासाठी काम करणार्‍या धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मते द्या !’

चर्च संघटनेकडून तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यांतील ख्रिस्ती मतदारांना आवाहन : अशा प्रकारे जाती आणि धर्म यांच्यासाठी संकुचित विचाराने मत देण्याचे राज्यघटनेविरोधी आवाहन करणार्‍या चर्च संघटनेवर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे आणि यासाठी हिंदूंच्या संघटनांनी तक्रार केली पाहिजे !

बालाकोट येथील एअर स्ट्राईकनंतर पाककडून भारतीय सीमेवर ५१३ वेळा गोळीबार

४ सैनिक हुतात्मा, तर ६ नागरिकांचा मृत्यू : ‘आता आतंकवाद सहन करणार नाही’, असे म्हणणारे पंतप्रधान मोदी पाककडून गेल्या दीड मासात झालेला गोळीबार आणि त्यात सैनिकांना आलेले हौतात्म्य यांविषयी गप्प का आहेत ? पाकला कायमचा धडा मिळेल, असा प्रयत्न का केला जात नाही ?

जपानमधील कॅथलिक चर्चच्या पाद्रयांकडून झालेल्या लैंगिक शोषणाचीही चौकशी होणार

पाद्रयांकडून लहान मुलांच्या होणार्‍या लैंगिक शोषणाचे लोण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया यानंतर आता जपानपर्यंतही पोचले आहे; ख्रिस्ती चर्च म्हणजे ‘लैंगिक शोषणाचे केंद्र’ आणि पाद्री म्हणजे ‘वासनांध व्यक्ती’ असेच चित्र आता जगभरातील समाजात निर्माण झाले आहे, असे दिसून येते !

डोंबिवली येथील सनातनचे साधक अजय संभूस आणि संदीप अग्निहोत्री यांची पोलीस हवालदार बाबरे यांच्याकडून चौकशी !

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी हिंदुद्वेषी पोलिसांनी सनातनच्या साधकांच्या मागे लावलेला चौकशीचा ससेमिरा ! अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

सोहळ्याला शंखनाद करून, तसेच सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब आणि व्यासपिठावरील अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला.

रामगड (झारखंड) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या मिरवणुकीवर दीड घंटे दगडफेक

दीड घंटे पोलिसांच्या उपस्थितीत धर्मांधांकडून पूर्वनियोजित आक्रमण होत असेल, तर असे पोलीस अचानक आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण कसे करणार ? धर्मांधांकडून अशा प्रकारे आक्रमणाचा प्रयत्न केला जाणार होता, हे पोलिसांच्या गुप्तचरांना कसे कळले नाही ? ते झोपले होते का ?

भारत श्रीलंकेच्या सैनिकांना प्रशिक्षण देणार

श्रीलंकेच्या सैन्याकडून लिट्टेच्या विरोधातील युद्धाच्या वेळी ३५ सहस्र निरपराध हिंदूंचे हत्याकांड करण्यात आले असतांना त्याला प्रशिक्षण देण्याची गांधीगिरी भाजप सरकार का करत आहे ?

अलवर (राजस्थान) येथे प्रचारसभेत काँग्रेसच्या दोन गटांत हाणामारी

एकमेकांमध्येच हाणामारी करणारे कार्यकर्ते असणारे राजकीय पक्ष कधीतरी समाजातील तेढ नष्ट करून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करू शकतील का ?


Multi Language |Offline reading | PDF