कोटी कोटी प्रणाम !

• श्रीरामनवमी
• रामदासस्वामी जयंती
• सिंधुदुर्ग येथील सनातनच्या १४ व्या संत पू. (श्रीमती) द्वारावती रेडकरआजी यांचा आज वाढदिवस

हिंदूंनो, श्रीरामाचा आदर्श अनुसरून श्रीरामनवमी खर्‍या अर्थाने साजरी करा !

भावी हिंदु राष्ट्रात मात्र श्रीरामाचे चरित्र शालेय जीवनापासूनच शिकवण्यात येईल, तसेच या चरित्राच्या आधारशिलेवरच राज्यव्यवस्थेची जडणघडणही करण्यात येईल. यामुळे हिंदु राष्ट्र हे रामराज्यासारखेच आदर्श असेल. यासाठीच हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील व्हा !’ – पू. संदीप आळशी

तुमच्यासारखे लोक देशात शांतता नांदू देणार नाहीत ! – न्यायालयाची याचिकाकर्त्यावर टीका

हिंदूंनी त्यांच्या पवित्र धार्मिक ठिकाणी पूजा करायची मागणी केल्यावर देशात अशांतता निर्माण कशी होते ? भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक व्यक्ती न्यायालयात न्याय आणि अनुमती मागू शकते. त्यावर न्यायालय अशा प्रकारचे विधान कसे काय करू शकते ? हा व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचा अवमान नाही का ?

आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याची अनुमती चौकीदाराने दिली आहे ! – नरेंद्र मोदी

आतंकवाद्यांना घरात घुसून मारूनही त्यांची आक्रमणे जराही अल्प झालेली नाहीत. प्रतिदिन काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे चालू आहेत, प्रतिदिन सैनिक हुतात्मा होत आहेत. त्यामुळे प्रतिदिन आतंकवाद्यांना मारत बसण्यापेक्षा त्यांचा निर्माता असलेल्या पाकलाच संपवण्याचे धाडस आता सरकारने दाखवायला हवे !

ठाणे येथील सनातनचे साधक प्रसन्न ढगे यांच्या निवासस्थानी जाऊन कल्याण येथील गुन्हे अन्वेषण शाखेचे विनोद पाटील आणि गुणे आका यांनी केली चौकशी

राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणार्‍या सनातनच्या निरपराध साधकांची वारंवार चौकशी करून त्यांना नाहक छळणारे पोलीस कायद्याचे राज्य काय देणार ? अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी… हिंदूंचा शतकानुशतके रक्तरंजित लढा !

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्राच्या जन्मभूमीवर असलेले मंदिर उद्ध्वस्त करून त्या स्थानी हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर आक्रमक जहिरूद्दीन बाबर याने मशिदीची निर्मिती केली. या संबंधित काही ऐतिहासिक दस्तावेज येथे देत आहोत.

(म्हणे) ‘भारताने पुलवामाप्रकरणी कारवाई करण्यायोग्य पुरावेच दिले नाहीत !’ – पाकचा पुन्हा कांगावा

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणामध्ये जैश-ए-महंमदचा सहभाग असल्याच्या प्रकरणी भारताने सादर केलेल्या पुराव्यांवर भारताला यापूर्वी काही प्रश्‍न विचारले आहेत. त्याची अद्याप त्यांची उत्तरे मिळालेली नाहीत. भारताने यावर उत्तरे द्यायला हवीत.

अमेरिकेच्या ‘पेंटागॉन’कडून पुन्हा एकदा भारताच्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणीचे समर्थन

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असलेल्या ‘पेंटागॉन’ने पुन्हा एकदा भारताच्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या चाचणीचे समर्थन केले. यापूर्वी अमेरिकेची ‘अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘नासा’ने ‘भारताने केलेल्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे ….

हिंदूंचा विश्‍वासघात !

निवडणुकांची रणधुमाळी सध्या चालू आहे. प्रत्येकच उमेदवार मतांच्या लालसेपोटी जनताजनार्दनाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मतांच्या लालसेपोटी या काळात अनेक आश्‍वासनांची खैरात झाली, पुष्कळ आमीषेही दाखवली गेली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now